सोशल मीडियावर व्हायरल होतेय पाणीपुरी खायची ही हटके स्टाईल

पाणीपुरी ही अनेक  मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे.

Updated: Sep 22, 2017, 05:44 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल होतेय पाणीपुरी खायची ही हटके स्टाईल  title=

मुंबई : पाणीपुरी ही अनेक  मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे.

फास्टफूड किंवा स्ट्रीट फूड पैकी पाणीपुरी हा अनेकांचा वीक पॉईंट आहे.

सध्या सोशल मीडियामध्ये पाणीपुरी खाणार्‍या एका महिलेचा व्हिडीओ झपाटयाने व्हायरल होत आहे. तीन मिनिटांचा हा व्हिडीओ एका पाणीपुरी स्पर्धेतील दिसत आहे. यामध्ये एक महिला प्लेटमधील पुर्‍यांचा चुरा करते. त्यावर थोडं पाणी पुरीचं पाणी मिसळून त्या नरम करते आणि गपागप खाते. उरलेले पाणीपुरीचे पाणी त्यावर पिते.

 

विचित्रपणे पाणीपुरी खाणारी ही महिला सध्या सोशल मीडियामध्ये झपाटयाने व्हायरल होत आहे. पाणीपुरी खाण्याचा हा प्रकार किळसवाणा वाटत असला तरीही आठवड्याभरामध्ये या व्हिडिओला  २०लाख व्हुज्स  मिळाले आहेत. तर १८ हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला शेअरदेखील केले आहे.