नव्या नवरीचा पदर उचलताच नवरा झाला शॉक, हनिमूनच्या रात्री असं काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी वाजत गाजत लग्न करून आणलेली बायको जेव्हा....

Updated: Nov 20, 2022, 12:56 AM IST
नव्या नवरीचा पदर उचलताच नवरा झाला शॉक, हनिमूनच्या रात्री असं काय घडलं? title=

Crime News : लग्न झाल्यावर प्रत्येक जोडप्यासाठी पहिली रात्र स्पेशल असते. त्यामुळे लग्न झाल्यावर बाहेर पर्यटनाच्या ठिकाणी हनिमून प्लॅनिंग करतात. मात्र एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हनिमूनच्या पहिल्या रात्री पतीसोबत असं काही घडलं आहे की तुम्हीही शॉक होताल. स्वत: पतीनेही असा विचार केला नव्हता की त्याच्यासोबत असं काही घडणार असेल. 

नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जैथरा इथलं हे प्रकरण आहे. 3 मेला लग्न झालेलं असतं, लग्न होण्याआधी मुलीच्या घरच्यांनी मुलाला अंधारात ठेवत मोठी गोष्ट लवपत हा विवाह सोहळा ठरवला होता. ठरल्याप्रमाणे लग्न होतं आणि दुसऱ्या दिवशी मुलगी निरोप घेऊन आनंदाने वधूसोबत घरी नांदायलाही येते. 

प्रथेप्रमाणे सर्वांसारखी यांचीही पहिली रात्र असते, मात्र पतीचा पहिल्याच दिवशी हिरमोड होतो. कारण त्याची पत्नी त्याला पहिल्या दिवशी शारीरिक संबंध ठेवायला नकार देते. तो तरीही नाराज न होत समजून घेतो मात्र दुसऱ्या दिवशी खरी कहानी समोर येते. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी तिला विचारतो तेव्हा पत्नी त्याला आपण किन्नर असल्याचं सांगते. 

दोन दिवसांपूर्वी वाजत गाजत लग्न करून आणलेली बायको जेव्हा असं बोलते तेव्हा हे एकूण पतीला मोठा धक्का बसतो. असा आरोप आहे की, पाच दिवसांनी आरोपी पत्नी, सासू, वहिनी, सासरे आले आणि दागिने, पैसे घेऊन पळून गेले. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.