Shraddha Murder Case: श्रद्धा वाल्कर (Shraddha Walker) हत्याकांडाचा अद्याप पर्दाफाश झाला नाही. या घटनेतील आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र हत्येचा अद्याप योग्य तसा उलगडा झाला नाही. त्यामुळे पोलिस सतत आरोपी आफताबची चौकशी करत आहेत. मात्र आफताब त्यांना चुकीचा जबाब देऊन तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पोलिसांनी आफताबच्या नार्को टेस्टची (Narco Test) मागणी केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे. त्यामुळे आता त्याची नार्को टेस्ट होणार आहे. या नार्को टेस्टमध्ये त्याला 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. य़ा प्रश्नांची यादी समोर आली आहे.
श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Walker) आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याची सोमवारी नार्को टेस्ट होऊ शकते. दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी केली जाणार आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने पोलिसांना आरोपी पूनावालाची पाच दिवसांत नार्को टेस्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पूनावाला यांच्याविरुद्ध कोणताही थर्ड डिग्री उपाय वापरता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी नार्को टेस्टमध्ये (Narco Test) विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये सुमारे 50 प्रश्न समाविष्ट आहेत. हे प्रश्न कोणते आहेत ते वाचूयात.
1. तुमचे पुर्ण नाव काय?
2. तुमची जन्मतारीख काय?
3. तुम्ही कुठून आहात?
4. घराचा पत्ता काय?
5. तुमच्या पालकांचे नाव काय?
6. तुम्ही कोणत्या व्यवसायात आहात?
7. तुम्ही श्रद्धा वाल्करला ओळखता का?
8. श्रद्धा कुठे राहायची?
9. तुम्ही दोघे कुठे भेटलात?
10. तु श्रद्धाला कसं ओळखतोस?
11. तु श्रद्धाच्या घरी यायचा जायचास का?
12. तुमचे नाते कसे होते?
13. तुम्ही दोघे कधीपासून एकत्र राहत होतात?
14. श्रद्धाचे कुटुंबीय तुमच्या नात्यावर खुश होते का?
15. तुमच्या कुटुंबातील सदस्य दोघांमधील नात्यावर आनंदी होते का?
16. तुम्ही मुंबईत कुठे राहता?
17. तुझे नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईत श्रद्धासोबत भांडण झाले होते का?
18. भांडणाचे कारण काय होते?
19. तुम्ही दोघांनी मुंबई कधी सोडलं?
20. मुंबई सोडल्यानंतर तुम्ही प्रथम कुठे गेला होतात?
21. तुम्ही दिल्लीला कधी पोहोचलात?
22. तुम्ही दिल्लीत कुठे राहिलात?
23. तुम्ही मेहरौलीच्या घरात कोणत्या दिवशी शिफ्ट झालात?
24. 18 मे रोजी काय घडले?
25. तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले का?
26. कशावरून भांडण झाले?
27. खोलीत काय झाले?
28. तू का रागावला होतास?
29. तु श्रद्धाला का मारले?
30. त्यावेळी तु दारूच्या नशेत होतास का?
31. तु खून कसा केला?
32. श्रद्धाला मारल्यानंतर तुम्ही काय केले?
33. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही इंटरनेटवर अभ्यास केला होता का?
34. तुम्ही प्रेताचे तुकडे केलेत का?
35. मृतदेहाचे किती तुकडे केले?
36. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी तुम्ही शस्त्रे कोठून खरेदी केली होती?
37. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी तुम्ही त्याच शस्त्राचा वापर केला होता का?
38. तुम्ही फ्रीज कुठून विकत घेतला?
39. तुम्ही श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले?
40. श्रद्धाचा मोबाईल कुठे आहे?
41. हत्येच्या दिवशी तुम्ही आणि श्रद्धाने घातलेले कपडे कुठे आहेत?
42. तुम्ही शस्त्र कुठे फेकले?
43. किती दिवस तुम्ही मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकत राहिलात?
४४. मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकण्याची कल्पना तुम्हाला कुठून आली?
45. श्रद्धाच्या हत्येनंतर तुम्ही इतर मुलींनाही घरात आणले का?
46. त्या मुलींशी तुमची ओळख कशी झाली?
47. श्रद्धाच्या हत्येबद्दल तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना किंवा कोणाला सांगितले का?
48. श्रद्धाला मारून तुम्ही घरी आणलेली मुलगी कोण आहे?
49. काही दिवसांपूर्वी तुम्ही श्रद्धाच्या हत्येची योजना आखली होती का?
50. हे घर फक्त खून करण्यासाठी घेतले होते का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावालाने (Aftab Amin Poonawalla) 18 मे रोजी संध्याकाळी त्याची 'लिव्ह-इन पार्टनर' श्रद्धा वाल्कर (Shraddha Walker) (27) हिचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे फेकून दिले होते. या घटनेचा आता हळू हळू उलगडा होत आहे. आता नार्को टेस्टने तपास आणखीणच सोप्पा होणार आहे.