बिकानेर : Wife Swapping बायकोची अदलाबदल म्हणजेच 'वाईफ स्वॅपींग'ची (Wife Swapping) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पती जबरदस्तीने बायकोला परपूरूषासोबत झोपण्यास भाग पाडायचा. असं करून हे आंबट शौकीन पती पत्नीसोबत 'वाईफ स्वॅपींग'चा गेम खेळायचे. या गेममुळे वैतागलेल्या महिलेने पोलिस स्टेशन (Police) गाठत आता पती विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर घटना चव्हाट्यावर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आपल्या बायकोसोबत 'वाईफ स्वॅपींग'चा म्हणजे बायकोची अदलाबदल करायचा. या वाईफ स्वॅपींगमध्ये (Wife Swapping) बायकोला जबरदस्ती परपूरूषासोबत झोपण्यास भाग पाडले जाते. तर स्वत: पुरुष इतर महिलेसोबत झोपतात. या घटनेत बायकोने अदला बदल होण्यास नकार दिल्याने पतीने तिला बेदम मारहाण (Wife beaten) केली. तसेच तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप तिने केला आहे.
पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तिचा पती बिकानेरमधील एका 5-स्टार हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. त्याने तिला हॉटेलच्या खोलीत बंद केले आणि तिचा फोन हिसकावून घेतला होता. दोन दिवसांनी तो मद्यधुंद अवस्थेत हॉटेलच्या रुममध्ये पोहोचला आणि ड्रग्ज आणि दारूच्या नशेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.पत्नीने तक्रारीत पुढे म्हटले की, वेगवेगळ्या मुली अथवा मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवणे त्याच्यासाठी सामान्य गोष्ट असल्याचा खुलासा तिने केला.
पत्नी तक्रारीत पुढे म्हणाले की, पतीने तिला अदलाबदला म्हणजे 'वाईफ स्वॅपींग'चा (Wife Swapping) भाग होण्यास सांगितले होते. जेव्हा तिने गेमचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा त्याने मला मारहाण आणि शिविगाळ केली,माझ्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. या दरम्यान तिला गंभीर दुखापत देखील झाली होती.
पोलीस तक्रारीत पीडित पत्नी म्हणाली की, तिची आई आणि तिची मेहुणी आणि तिच्या पतीने 50 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली होती, असे तिने म्हटले.
या घटनेनंतर पत्नीची प्रकृती खूपच खालावली.यानंतर पत्नीच्या नातेवाईकांनी पतीच्या घरी येऊन तिला आपल्या घरी नेले. यानंतर पत्नीने भोपाळमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पतीची तक्रार केली. या तक्रारीनंतर पती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजस्थानमधील (Rajsthan) बिकानेरमध्ये ही घटना घडलीय.