हरणाला अजगर जिवंत गिळत होता, हे पाहून एक व्यक्ती पुढे आला पण... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

अजगर किंवा कोब्रा सापाचा कोणताही प्रकार असो त्याला सगळेच घाबरतात.

Updated: Apr 1, 2022, 10:25 PM IST
हरणाला अजगर जिवंत गिळत होता, हे पाहून एक व्यक्ती पुढे आला पण... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. त्यात काही लोकांना जंगलातील किंवा प्राण्यांचे व्हिडीओ पाहण्यासाठी फार आवडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका अजगर आणि हरणाचा आहे. ज्यामध्ये अजगर हळूहळू करुन कसा हरणाला गिळण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहायला मिळत आहे.

आपल्याला तर हे माहित आहे की, अजगर किंवा कोब्रा सापाचा कोणताही प्रकार असो त्याला सगळेच घाबरतात. तसाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खूपच भयानक आहे.

यामध्ये एक अजगर जिवंत हरणाला गिळण्याचा प्रयत्न करत आहे, हा अजगर इतका मोठा आहे की, त्याला पाहाताच तुमच्या हृदयाचा ठोका चूकेल. परंतु तरी देखील तेथे एक व्यक्ती मोठ्या धाडसाने या हरणाला त्या अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

जेव्हा अजगर हळूहळू हरणाला गिळण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा हा व्यक्ती एका झाड्या फांदीने अजगराला मारू लागला. आधी तर हा अजगर हरणाला सोडायला तयार नसतो. परंतु या व्यक्तीच्या अनेक प्रयत्नानंतर हा अजगर या व्यक्तीवर रागवतो आणि रागाने आपला जबडा उघडतो. तसेच या व्यक्तीच्या दिशेने उडी मारतो. जे पाहून ही व्यक्ती मागे हटते.  पण मग अजगर हरणाला तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने निघून जातो.

हा व्हिडीओ पाहून लोकांनी हरणाचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे 3 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.