सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2017, 11:04 PM IST
सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

राज्या-राज्यांत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्षही एकाच मांडवाखाली आल्याचं या निमित्तानं दिसलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माकपाचे सीताराम येच्युरी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा नेत्या मायावती यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. 

याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, डीएमकेच्या कनिमोळी, जेडीयूचे शरद यादव आदी बडे नेते यावेळी हजर राहिले. सरकारनं सर्वसंमतीचा उमेदवार दिला नाही, तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी यावेळी केला.