व्हिडिओ : मुलगी झाली म्हणून... दिराकडून वहिनीला हॉकीनं मारहाण

पंजाबच्या पटियालामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत एक पुरुष एका स्त्रिला हॉकी स्टिकनं मारहाण करताना दिसतोय.

Updated: Jul 15, 2017, 05:24 PM IST
व्हिडिओ : मुलगी झाली म्हणून... दिराकडून वहिनीला हॉकीनं मारहाण title=

नवी दिल्ली : पंजाबच्या पटियालामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत एक पुरुष एका स्त्रिला हॉकी स्टिकनं मारहाण करताना दिसतोय.

मीडिया रिपोर्टनुसार, हुंड्याच्या मागणीसाठी आणि मुलगी झाली म्हणून मीना नावाच्या या महिलेला मारहाण करण्यात येतेय. ही मारहाण तिच्या दिरानं आपल्या काही मित्रांसोबत मिळून केलीय.

हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांवर बरीच टीका होतेय. ही घटना १४ जुलै रोजी घडल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केल्याचंही सांगण्यात येतंय.

दलजीत सिंहसोबत विवाह झाल्यानंतर मीनाला हुंड्यासाठी तिच्या सासरच्यांकडून छळलं जात होतं. त्यातच तिनं काही दिवसांपूर्वी मीनानं काही दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला या मुलाचाही तिच्या सासरच्यांनी स्वीकार केला नाही. 

त्यामुळे महिला पतीपासून वेगळी राहत होती. तिच्या घरी जाऊन दिरानं आपल्या मित्रांसहीत तिच्यावर हल्ला केला.