दिल्लीः लिव्ह-इन रिलेशनशिपच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचं समोर येत आहे. अलीकडेच मिरारोडमध्ये एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आला होता. तर, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने देश हादरला होता. आता दिल्लीत पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इनपार्टनरसोबत झालेल्या भांडणांनंतर तरुणीने चाकुनेवर वार केला आहे. पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेला अटके केली आहे. तर, पीडित तरुण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दक्षिण-पश्चिम दिल्लीतील किशनगढ परिसरात दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. हे वाद नंतर टोकाला गेले की तरुणीने तिच्या प्रियकरावर चाकूने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला रविवारी ताब्यात अटक केली आहे. व याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा बॉयफ्रेंड हा नागालँडचा रहिवासी आहे. त्याचे नाव सॅमुअल रेसू असं असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सफदरजंग रुग्णालयातून पोलिसांना फोन आला होता. एका व्यक्तीच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले आहेत. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे की, रेसू आणि त्याच्या प्रेयसीचे भांडण झाले होते. त्यावरुन रागाच्या भरात तिने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दोघंही अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते. पीडित तरुणानेही त्याच्या प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तरुणीविरोधात भारतीय दंड संहिते कलम 307 अंतर्गंत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. तसंच, तिच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिरा रोड येथे घडलेल्या प्रकरणामुळं संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी मनोज सानेने सरस्वती वैद हिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तर, आरोपी मनोज सानेवर श्रद्धा वालकर हत्याकांडाचा प्रभाव असल्याचं त्याने कबुलीजबाबात स्पष्ट केले आहे. आरोपी मनोज सानेने श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याचा आभ्यास केल्याचंही त्याने म्हटलं आहे.