पुलमध्ये महिलेचा 'Catwalk', सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

महिलेने कसा केला असेल पुलमध्ये 'Catwalk', तेही सरळ नाही तर उलटं होऊनही, VIDEO पाहिल्यानंतरही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Updated: Sep 5, 2022, 07:47 PM IST
पुलमध्ये महिलेचा 'Catwalk', सोशल मीडियावर VIDEO व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ प्रचंड पसंतीस उतरतात, तर काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावेसेच वाटतात. असाचं एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे ते जाणून घ्या.  

व्हिडिओत काय?
स्टेजवर कॅटवॉक (Catwalk) करताना तुम्ही अनेक मॉडेल्स पाहिले असतील. या कॅटवॉकमागे त्यांची अनेक महिन्यांची मेहनत असते. अनेक दिवसांच्या सरावानंतरच हे मॉडेल स्टेजवर चांगले चालण्यासाठी स्वत:ला तयार करू शकतात. मात्र एका महिलेने स्टेजवर नाही तर पुलमध्ये कॅटवॉक (Catwalk) केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला पूलमध्ये उलटी चालताना दिसेल. पुढे ती स्त्री मागे वळते, एक हँडबॅग उचलते आणि पुढे जाते.हा व्हिडिओ पाहुन अनेकांना धक्का बसला आहे.  

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या एका महिलेने स्विमिंग पूलमध्ये तिच्या उलट्या कॅटवॉकने (Catwalk) सोशल मीडिया यूजर्सची मने जिंकली आहेत. या क्लिपमध्ये, तुम्हाला एक महिला हील्स घालून, पूलमध्ये उलटी चालताना दिसेल. ती देखील पलटते, मग एक हँडबॅग उचलते, लटकते आणि पुढे चालू ठेवते. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. तसेच नेटकऱ्यांना या व्हिडिओवर विश्वास बसत नाहीए. 

क्रिस्टिमकुशा या युजरने हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 1.9 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडिओला 18 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.