इमरजन्सी एन्ट्री याला म्हणतात! साडीतही रेल्वेच्या खिडकीतून बोगीत घुसण्याच्या या धाडसाला तुम्ही काय म्हणाल?

ट्रेनचा दरवाजा सोडून थेट महिला खिडकीतून घुसली रेल्वेच्या डब्यात आणि तेही साडीमध्ये...पाहा जबरदस्त व्हिडीओ

Updated: Jul 26, 2021, 11:01 PM IST
इमरजन्सी एन्ट्री याला म्हणतात! साडीतही रेल्वेच्या खिडकीतून बोगीत घुसण्याच्या या धाडसाला तुम्ही काय म्हणाल?

मुंबई: रेल्वे गाडीच्या प्रत्येक बोगीला एक आपात्कालीन खिडकी असते. या खिडकीचा वापर आपात्कालीन परिस्थिती करण्यात येतो त्यामुळे ही खिडकी त्यासाठी देण्यात आली आहे. मात्र या खिडकीचा वापर चक्क ट्रेनमध्ये घुसण्यासाठी एक महिलेनं केला आहे. हे धडस चक्क या महिलेनं साडी नेसलेली असताना केलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला बोगीतील माणसाती बोलत आहे. अचानक ती आपात्कालीन खिडकीचा वापर करून बोगीत घुसण्याचा प्रयत्न करते आणि तिला यशही मिळतं. हा व्हिडीओ पाहून युझर्सना हसू अनावर झालं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. 

आतापर्यंत हा व्हिडीओ 60 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यापैकी 47 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. महिलेचा हा अजब जुगाड काही युझर्सना आवडला आहे. तर काहींनी यावर महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता असं म्हणत संतापही व्यक्त केला आहे. काही युझर्सनी सीटसाठी जुगाड केल्याचंही या व्हिडीओच्या खाली कमेंट करत म्हटलं आहे.