हा बॅकलेस ब्लाऊज नाहीतर, मेहंदीचा ब्लाऊज... स्टाईल पाहून नोटकऱ्यांना पडला प्रश्न, पाहा व्हिडीओ

या तरुणीचा हा लूक पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Updated: Dec 1, 2021, 02:45 PM IST
हा बॅकलेस ब्लाऊज नाहीतर, मेहंदीचा ब्लाऊज... स्टाईल पाहून नोटकऱ्यांना पडला प्रश्न, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : साडी हा असा पेहराव आहे, जो महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. साडीमुळे आपली भारतीय संस्कृतीची तर दिसतेच, परंतु हा सर्वात सुंदर पेहरावही मानला जातो. परंतु पारंपारीक पद्धतीचा मुळ पेहरावा वेगळा लोकं आता वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसु लागले आहेत. काही लोकं साडीला टीशर्ट किंवा टॉप सोबत घालतात, तर काही लोकं बॅकलेस ब्लाऊज किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या ब्लाऊजसोबत साडी घालतात, ज्यामुळे त्या लोकांचा लूक वेगवेगळा दिसतो. ब्लाऊज शिवाय आपण साडी नेसण्याचा विचार देखील करु शकत नाही.

परंतु एका महिलेनं विना ब्लाऊज साडी नेसली आहे. एवढंच नाही तर या महिलेनं ब्लाऊजच्या जागी डिझाईनची मेहंदी काढली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावरती हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या तरुणीचा हा लूक पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. तर काही लोकांना तिचा हा लूक फारच आवडला आहे. यावर लोकही आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये साडी घातलेली एक महिला कुठेतरी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की यामध्ये काय आहे, जो इतका व्हायरल होत आहे. परंतु तुम्ही याला निट पाहिले तर तुम्हाला समजेल की, या महिलेने पांढरी साडी नेसलेली आहे. ज्यामध्ये तिने ब्लाउजऐवजी मेहंदीने डिझाइन केलेला ब्लाउज घातला आहे.

महिलेच्या अंगावर मेहंदी डिझाईन करून ब्लाउज तयार केल्याचे पाहायला मिळते.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर thanos_jatt नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मेहंदी ब्लाउज. आता पुढे काय होणार?' या व्हिडीओला आतापर्यंत दोन हजार लोकांनी लाईक केले आहे, तर अनेक युजर्सनी यावर आपले मत मांडले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, 'फॅशनच्या नावावर आता काहीही होत आहे.' अशीच काहीशी प्रतिक्रिया इतर लोकांकडूनही पाहायला मिळत आहे. काही यूजर्स असेही आहेत, जे म्हणतात की, कॅप्शन पाहिल्यानंतर त्यांना समजले की हिना ब्लाउज म्हणजेच मेहंदी ब्लाउजबद्दल येथे बोलले जात आहे. एकूणच हिनाच्या ब्लाउजच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.