Hijab | हिजाबवरून हंगामा, मुस्लीम तरुणींचं 'शक्तिप्रदर्शन'

हिजाबला समर्थन देण्यासाठी मुस्लीम महिला आणि तरूणींनी देशातल्या विविध भागात शक्तिप्रदर्शन केलं आहे.  

Updated: Feb 10, 2022, 10:37 PM IST
Hijab | हिजाबवरून हंगामा, मुस्लीम तरुणींचं 'शक्तिप्रदर्शन' title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  हिजाबचा वाद आता देशभर पेटला आहे. हिजाबला समर्थन देण्यासाठी मुस्लीम महिला आणि तरूणींनी देशातल्या विविध भागात शक्तिप्रदर्शन केलं आहे. हिजाबच्या समर्थनात मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्येही काही कॉलेज तरुणी  फुटबॉल खेळल्या तर काहींनी थेट वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले. (women wearing hijab and riding bike and playing football video goes viral in social media)

हिजाबचं शक्तिप्रदर्शन

हिजाब घालून या मुस्लीम तरुणी बाईकवरून सुसाट निघाल्या आहेत.  मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरातल्या व्हीआयपी रोडवरची ही दृश्यं आहेत. देशभरात हिजाबवरून हंगामा सुरू असताना, हिजाब घालून धूम स्टाईल बाईक सवारी करणाऱ्या या मुस्लीम तरुणी. हातानं व्हीक्टरी अशी खूण करून त्या शक्तिप्रदर्शन करत आहेत. 

यापैकी दोघी बुलेटवर बसल्या आहेत. तर दुसऱ्या दोघी स्पोर्टस् बाईकवर आहेत. या चौघींपैकी एक तरुणी चक्क फ्लाईंग किस देतेय. सुसाट वेगानं बाईक चालवणाऱ्या या मुस्लीम तरुणींनी हिजाब घातला आहे. पण डोक्यावर हेल्मेट घालायला मात्र विसरल्या. वाहतूक नियमांची ऐशीतैशी करत त्यांची ही बिनधास्त बाईकसवारी सुरूय. 

केवळ रस्त्यावर नाही तर फुटबॉलच्या मैदानातही मुस्लीम तरुणींनी हिजाबच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन केलं. हिजाब घालून फुटबॉल खेळणाऱ्या या मुस्लीम विद्यार्थिनी. मध्य प्रदेश सरकारनं हिजाबवर बंदी घातली आहे.

या बंदीच्या निषेधार्थ मुस्लीम विद्यार्थिनींनी बाईक सवारी आणि फुटबॉल खेळण्याचा घाट घातला. काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांच्या इंदिरा प्रियदर्शिनी कॉलेजच्या या विद्यार्थिनी. हिजाब घालून त्या फुटबॉलच्या मैदानात उतरल्या होत्या.

हिजाबवरील बंदी हटवावी, यासाठी मुस्लीम समाजाच्या वतीनं देशभरात आंदोलनं सुरू आहेत. त्यात आता हिजाबच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.