गेल्या 4 वर्षात 16 फरारी भारतात, आता लक्ष्य माल्या आणि नीरवकडे

फरार होणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.

Updated: Dec 29, 2018, 08:11 PM IST
गेल्या 4 वर्षात 16 फरारी भारतात, आता लक्ष्य माल्या आणि नीरवकडे title=

नवी दिल्ली : फरार होणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. गेल्या 4 वर्षात पलायन केल्या 16 फरार आरोपींना भारतात आणण्यात आले आहे. 2018 मध्ये 5 फरारांनी भारतात आणण्यात आले. अगस्ता वेस्टलॅंड (Agusta Westland Case) व्हीव्हीआयपी हॅलीकॉप्टर करार प्रकरणात कथित संशयित बिचौलिया ख्रिश्चियन मिशेलला देखील भारतात आणण्यात आले आहे. 

2015 मध्ये 6 फरारी भारतात 

 परराष्ट्र राज्य मंत्री वीके सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना यासंदर्भात माहिती दिली. गेल्या चारवर्षात 2015 मध्ये सर्वाधिक 6 फरारी भारतात आणण्यात यश आले आहे. या 6 जणांमध्ये युनायटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ असम (ULFA) चे जनरल सेक्रेटरी अनूप चेतियाला बांगलादेशहून आणले गेले. 2016 मध्ये चार फरारी भारतात परत आले. 2017 मध्ये जॉब स्कॅम रॅकेटमध्ये सहभागी सुल्तान अबूबकर कादिरला सिंगापूरमधून भारतात आणले गेले. 

परदेशात 132 फरारी 

परदेशातून पळून भारतात आलेल्यांची संख्या 43 इतकी आहे तर भारतातर्फे 132 प्रत्यपर्ण केस विदेशात पाठवण्यात आल्या आहेत. भारताने गेल्या चार वर्षात अफगाणिस्तान, लिथुआनिया, मलावी आणि मोरक्को या चार देशात प्रत्यर्पण करारांवर सह्या केल्या. नीरव मोदीचे प्रत्यर्पण करण्यासाठी भारत लंडनवर दबाव टाकत आहे. भारताने ब्रीटनकडे नीरवला भारतात आणण्यासाठी दोन वेळा मागणी केली.

ब्रिटन अधिकारी यावर विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनने नीरवच्या राहण्याचे ठिकाण शोधले असून भारताच्या पथकाला माहिती देण्यात आली होती. विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठीही ब्रिटन सकारात्मक आहे. ब्रिटीश न्यायालयाने हे प्रकरण पुढे पाठवले आहे.