विक्राबाद: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर असदुद्दीन ओवेसी यांना हैदराबादमधून निझामाप्रमाणे पळ काढावा लागेल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते रविवारी तेलंगणाच्या विक्राबाद येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली. आगामी निवडणुकीत तेलंगणात भाजपची सत्ता आली तर ओवैसींना निझामाप्रमाणे हैदराबादमधून पळ काढावा लागेल. आमचे सरकार जनतेच्या सुरक्षेची काळजी घेईल. पण जे लोक अराजकता पसरवण्याचे काम करतात, त्यांच्या सुरक्षेची हमी आम्ही घेणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
@CMOfficeUP Mera jawab zaroor suno 7pm se 10pm ke Har jalsa mein https://t.co/hBvGBjBhld
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 2, 2018
हैदराबाद हा ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो. ग्रेटर हैदराबाद परिसरातील २४ मतदारसंघांमध्ये त्यांच्या पक्षाचा प्रभाव आहे. यापैकी सात मतदारसंघांमध्ये एमआयएमचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता योगी आदित्यनाथ यांच्या या टीकेला ओवैसी कशाप्रकारे प्रत्युत्तर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.