३० एप्रिलपर्यंत करा हे काम पूर्ण, पीएफ रक्कम होईल दुप्पट

पीएफ कन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलं तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हाच पैसा दुप्पट होईल

Updated: Apr 24, 2019, 09:42 AM IST
३० एप्रिलपर्यंत करा हे काम पूर्ण, पीएफ रक्कम होईल दुप्पट  title=

मुंबई : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ (provident fund) कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते. भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबानं खाजगी कंपन्यांत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एप्रिल महिना खुपच खास आहे. बऱ्याचदा खाजगी क्षेत्रात या महिन्यात कंपन्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल करतात. कंपन्यांमध्ये हा कामाच्या मूल्यमापनाची (appraisal) वेळ असते. अशावेळी चाकरमानी आपल्या पीएफच्या पैशांना या महिन्यात दुप्पट करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या एचआर विभागाशी संपर्क करावा लागेल. आपल्या पीएफची रक्कम वाढवण्यात यावी, अशा सूचना तुम्ही कंपनीला करू शकता. यामुळे तुमच्या हातात महिन्याच्या शेवटी थोडी कमी रक्कम हातात पडेल. परंतु, हाच वाचवलेला पैसा बचतीच्या रुपात आणि कर वाचवण्याच्या दृष्टीनं चांगला पर्याय असेल.

कंपनीशी करा संपर्क

आमची सहकारी वेबसाईट  www.zeebiz.com/hindi नं दिलेल्या बातमीनुसार, तुमच्या कंपनीकडून पीएफ फंड वाढवण्यात आला तर तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये प्रत्येक महिन्याला पीएफ फंडमध्ये जास्त पैसे जमा होतील. पीएफ कन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलं तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हाच पैसा दुप्पट होईल. सध्या एम्प्लॉईज प्रोव्हिडन्ट फंड म्हणजेच EPF वर ८.५५ टक्के व्याजदर मिळतो. पीएफचा समभाग वाढल्यानं त्यावर मिळणारं व्याजही अधिक असेल.

30 अप्रैल तक कर लें यह काम, गारंटीड डबल हो जाएगा आपके PF का पैसा

किती वाढवू शकतात पीएफ?

कर्मचारी भविष्य निधी संगठनेचे माजी सहाय्यक आयुक्त ए के शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचारी आपल्या कंपनीला सांगून आपल्या पीएफ कन्ट्रीब्युशनमध्ये वाढ करू शकतात. एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फंड कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांना हा हक्क मिळतो. नियमानुसार, मूळ वेतन आणि डीएच्या १२ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जमा होते. तेवढीच रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होते. नियमानुसार, कोणताही कर्मचारी आपला मासिक समभाग मूळ वेतनाच्या १०० टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो.

दुप्पट होणार पीएफची रक्कम

एखाद्या कर्मचाऱ्यानं आपलं मासिक समभाग दुप्पट केला तर त्याच्या पीएफ फंडची रक्कम आपोआपच दुप्पट होईल. म्हणजेच, सध्याच्या व्यवस्थेत मूळ वेतनावर १२ टक्के पीएफचा सहभाग असतो. परंतु, जर कर्मचाऱ्यांनी तो समभाग वाढवून २४ टक्के केला तर पीएफ फंड दुप्पट होईल.