VIDEO : 'बॉलिवूड खिलाडी'च्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींची उत्तरं

ही मुलाखत तुम्ही सकाळी ९ वाजता बघू शकाल, फक्त 'झी २४ तास'वर... 

Updated: Apr 24, 2019, 12:06 PM IST
VIDEO : 'बॉलिवूड खिलाडी'च्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींची उत्तरं title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. अद्याप महत्त्वाचे चार टप्पे बाकी आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत आज पाहता येणार आहे... बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं ही मुलाखत घेतली आहे, हे विशेष... ही मुलाखत तुम्ही सकाळी ९ वाजता बघू शकाल, फक्त 'झी २४ तास'वर...

अक्षय कुमारनं सोमवारी एक ट्विट केलं... 'अज्ञात आणि अपरिचित' अशा क्षेत्रात प्रवेश करतोय, असं म्हणत त्यानं एक सस्पेन्स निर्माण केला. यासोबतच आता अक्षय कुमारही राजकारणात सक्रियपणे उतरणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला. त्यानंतर अक्षयनं मंगळवारी एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारत त्यांची मुलाखत घेताना दिसतोय.

अक्षयनं पंतप्रधानांचे दोन व्हिडिओ ट्विट केले आहेत. दुसऱ्या एका प्रोमोत नरेंद्र मोदी हसताना दिसत आहेत. अक्षय यावर म्हणतो, 'पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या रणधुमाळीतही कसे हसताना दिसतात. उद्या तुम्हाला याचं उत्तर मिळेल'

दरम्यान, मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं. देशातल्या ११६ मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. हिंसाचारानंतरही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये सरासरी ७३ टक्के मतदान झालंय. तर आसाममध्ये  ७४.६५ %, बिहार ५९.९७ %, छत्तीसगड ६५.०८ %, गोवा ७१ %, गुजरात ५९ %, कर्नाटक ६४.८ %, केरळ ७० %, ओडिशा ५८ %, त्रिपुरा ७८.३७ %, उत्तर प्रदेश ५७.६४ %, दादरा नगर हवेली ७१.४३ % मतदान नोंदवण्यात आलंय. 

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात सरासरी ५६.२५ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर येतेय. राज्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, निलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठापणाला आहे.