पीएम केअर फंडसाठी झी समुहाचं योगदान, पंतप्रधानांकडून कौतुक

झी समुहाचं कोरोनाच्या विरोधात लढाईसाठी योगदान

Updated: Apr 7, 2020, 08:47 PM IST
पीएम केअर फंडसाठी झी समुहाचं योगदान, पंतप्रधानांकडून कौतुक  title=

मुंबई : कोरोना सारख्या महामारीमुळे संपूर्ण देश एकत्र येऊन लढत आहे. अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीने यामध्ये योगदान देत आहे. कोणी पैशांच्या माध्यमातून तर कोणी अन्य-धान्य वाटप करुन देशसेवा करत आहेत. प्रत्येक जण आपलं योगदान देत आहे. या लढाईत ZEE Group ने देखील आपलं योगदान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर झी समुहाने पंतप्रधान केअर फंडमध्ये योगदान दिलं. पंतप्रधान मोदी यांनी देखील यासाठी झी समुहाचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं की, ''मी पीएम-केअरसाठी झी समुहाने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक करतो. यामुळे कोविड १९ च्या विरोधात आपली लढाई आणखी मजबूत होईल.''

झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेज लिमिटेडचे एमडी आणि सीईओ पुनीत गोयंका यांनी ट्विट केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली. पुनीत गोयंका यांनी ट्विट करत म्हटलं की, '' ZEE चे ३५०० हून अधिक कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आले आहेत. कर्मचाऱ्यांनी दिलेलं योगदान आणि झी समुहाचं योगदान एकत्र करत ही रक्कम पीएम केअर्स फंडवा पाठवण्यात येईल.''

पीएम मोदींनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.