200 च्या नोटवर 'Full Of Fun'... ATM मधून निघाली कोरी करकरीत नोट!

Zomato Food Delivery Money From ATM: उत्तर प्रदेशातील एका ATM मधून 200 रुपयांची नोट बाहेर आली आहे, हे पाहून लोकांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या विचित्र नोटचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होतोय.

Updated: Oct 26, 2022, 11:00 PM IST
200 च्या नोटवर 'Full Of Fun'... ATM मधून निघाली कोरी करकरीत नोट! title=

200 Rupees Note Video: सोशल मीडियावर एकापेक्षा जास्त विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. उत्तर प्रदेशातील अमेठीमधील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. लोकांची फसवणूक झाल्याच्या आरोप करण्यात आलाय. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशात 200 च्या एका नोटीची एकच चर्चा सुरू असल्याचं दिसतंय.

अमेठीतील एका एटीएममध्ये अशीच एक नोट समोर आली आहे. ही नोट पाहून अनेकांनी डोक्याला हात लावलाय. ही नोट नकली असल्याचं समोर आलं आहे. अशाच बनावट नोटा एटीएममधूनच कॉपी होऊ लागल्या तर लोकांचाही घाम सुटू शकतो. नोट नकली असल्याचं कळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी पोलिसांना कॉल लावून माहिती दिली.

आणखी वाचा - झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, माहिती मिळताच अमेठी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तेथे उपस्थित लोकांची चौकशीही केली. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारोंनी त्याला लाईकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.