उद्धव ठाकरेंना आरक्षणातलं काय कळतं, राणेंची खोचक टीका

उद्धव ठाकरेंना फक्त पैशाच्या टक्केवारीची गणितं समजतात.

Updated: Aug 2, 2018, 08:17 AM IST
उद्धव ठाकरेंना आरक्षणातलं काय कळतं, राणेंची खोचक टीका title=

रत्नागिरी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आरक्षणाच्या प्रश्नाची काय समज आहे, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. खासदार झाल्यानंतर राणे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. राणेंच्या नियोजित सभांपैकी पहिली सभा बुधवारी चिपळूणमध्ये पार पडली. 

यावेळी नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, सरकार त्याला मंजूरी देईल, असे उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची मुळात गरज काय?

भारतीय राज्यघटनेतील कलम १५ व १६ नुसार मागासवर्गीय अहवालाच्या आधारावर राज्य सरकार आरक्षणाबाबतचा निर्णय घेऊ शकते. या सगळ्याची जाण उद्धव ठाकरेंना नाही. त्यांना फक्त टक्केवारीची गणिते समजतात, अशी टीका नारायण राणे यांनी केली. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आयोजित केलेल्या या सभेत नारायण राणेंनी कोकणी माणसाने आता शिवसेनेची साथ सोडावी, असे आवाहनही केले.