Jaya Bachchan Ignore Kangana Ranaut : बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये वाद असतात. काही वेळा असं काही होतं ज्यामुळे चाहत्यांना देखील सेलिब्रिटींमध्ये वाद असल्याचं लक्षात येतं. आता देखील एक असा व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री जया बच्चन आणि कंगना रानौत (kangana ranaut vs jaya bachchan) यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. अभिनेते अनुपम खैर यांनी 'ऊंचाई' (uunchai) सिनेमाच्या स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. स्क्रिनिंग दरम्यान जया बच्चन आणि कंगना आमनेसामने आल्या.
सिनेमीच्या स्क्रिनिंगला मोठ्या सेलिब्रिटींची हजेरी
सिनेमाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली. यामध्ये जया बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रनौत, अभिषेक बच्चन, भाग्यश्री देखील होते. यावेळी जया बच्चन आणि कंगनामध्ये असलेला वाद समोर आला. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ( jaya bachchan slams kangana ranaut)
जया बच्चन आणि कंगना रानौत
व्हिडीओमध्ये कंगना, अनुपम खैर आणि बोमन ईराणी यांच्यासोबत उभी असल्याचं दिसून येत आहे. तेव्हा त्या ठिकाणा जया बच्चन येतात. पण जया यांनी कंगनाची भेटही घेतली नाही, शिवाय त्यांनी अभिनेत्रीकडे पाहिलं देखील नाही. दोघींच्या अबोल्यामुळे त्यांच्यात काही वाद असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
अभिषेक बच्चन आणि कंगना रानौत
दरम्यान जया यांच्या पाठोपाठ अभिनेता अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) देखील सिनेमाच्या स्क्रिनिंगला एन्ट्री झाली. तेव्हा कंगनाला पाहताच अभिषेकने तिला मिठी मारली. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (abhishek hug kangana ranaut)
'ऊंचाई' सिनेमात अनेक प्रसिद्ध कलाकार दिसणार मोठ्या पडद्यावर
'ऊंचाई' सिनेमात अनेक प्रसिद्ध कलाकार एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन, बोमन ईरानी, डॅनी डेन्जोंग्पा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'ऊंचाई' सिनेमा 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.