ब्लॅक टी मध्ये लिंबू मिसळून पिणे किती योग्य? किडनीसाठी ठरु शकते धोकादायक!

Black Tea With Lemon Side Effects: काळा चहा आणि लिंबू या दोघांचे एकत्रित मिश्रण करुन पिणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 15, 2024, 01:04 PM IST
ब्लॅक टी मध्ये लिंबू मिसळून पिणे किती योग्य? किडनीसाठी ठरु शकते धोकादायक! title=
Black Tea With Lemon Vitamin C May Affects Your Kidney

Black Tea With Lemon Side Effects in MArathi: भारतात चहा पिणाऱ्या नागरिकांची संख्या खूप जास्त आहे. पाण्यानंतर सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय म्हणजे चहा. सकाळी चहा प्यायल्याशिवाय कोणालाही फ्रेश वाटत नाही. तर,संध्याकाळीही कामातून ब्रेक घेतल्यानंतर चहाची गरज भासते. मात्र, अनेकदा चहा पिण्याबाबत आरोग्य तज्ज्ञ इशारा देतात. दूध आणि साखर घेतलेला चहा गरजेपेक्षा जास्त प्यायल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळंच काही जण हेल्दी पर्याय म्हणून ब्लॅक टी निवडतात. पण काळा चहा पिणेदेखील सुरक्षित आहे का? हे जाणून घेऊया. 

ब्लॅक टी आणि लिंबाचे कॉम्बिनेशन

जे लोक दूध आणि चहा असलेला चहा पिणे टाळतात. ते काळा चहा म्हणजेच ब्लॅक टीच्या सेवनाकडे भर देतात. काही जण यात लिंबू पिळूनही पितात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचा उत्तम गुण असल्याचे मानले जाते. ज्यामुळं रोगप्रतिकारशत्ती वाढते. त्यामुळंच करोना महामारीच्या काळात लोक काढा करुन पिण्यावर भर देत होते. मात्र हा उपाय नेहमीसाठीदेखील फायदेशीर ठरेलच याची काही शाश्वती नाही. 

किडणीसाठी ठरु शकते हानिकारक 

एका रिपोर्टनुसार, मुंबईत राहणाऱ्या एका रहिवाशांच्या पायांना सूज आली होती. त्याव्यतिरिक्त त्याला उलटी, भूक न लागणे अशा तक्रारी येत होत्या. तपासणी केल्यानंतर आढळले की, किडनीचे नुकसान झाले होते. त्याची किडणीची प्रक्रिया नीट होत असल्याचे समोर आले आहे. जेव्हा या रुग्णांची मेडिकल हिस्ट्री व सगळे रिपोर्ट तपासण्यात आले. तेव्हा लक्षात आले की हा व्यक्ती ब्लॅक टीसोबत व्हिटॅमिन सीचे सेवन करत होता. हे काही पहिलेच प्रकरण नाहीये. असे अनेक जण आहेत जे लिंबू आणि काढा पिऊन किडणीला नुकसान पोहोचवत आहेत. 

आत्ताच सावध व्हा!

जे लोक प्रमाणापेक्षा जास्त लिंबू असलेला काढा पितात त्यांचा केरेटिनिन वाढू शकते. शक्यतो केरेटिनिनची लेव्हल 1पेक्षा जास्त असायला हवा. किडणीचे काम शरीरातील तरल पदार्थांतील घाण साफ करणे हे आहे. जर यात काही अडचण आल्यास त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. 

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही एखाद्या पदार्थाचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त केल्यास ते आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. त्यामुळं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणातच काढा पिऊ शकता. जर शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढले तर शरीरात ऑक्सिलेटची मात्रा वाढते. ज्यामुळं किडनी इन्फेक्शन आणि किडनी फेल्युअरसारख्या आजारांमध्ये वाढ होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)