मुलांचं कौतुक करताना 10 वेळा विचार करा, 4 चुका मुलांना करतील हट्टी आणि बेशिस्त

Parenting Tips : पालक म्हणून मुलांचं कौतुक करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेची असते. तुमच्या 4 चुका मुलांना बेजबाबदार ठरवू शकते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 21, 2024, 06:14 PM IST
मुलांचं कौतुक करताना 10 वेळा विचार करा, 4 चुका मुलांना करतील हट्टी आणि बेशिस्त title=

Praising your kid in healthy way: प्रत्येकाला स्तुती किंवा प्रशंसा आवडते. विशेषत: लहान मुलांचे त्यांच्या छोट्या प्रयत्नांचे कौतुक झाले तर त्यांना खूप आनंद होतो आणि प्रेरणाही मिळते. मुलांची स्तुती केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमध्येही रस निर्माण होतो. पण, मुलांचे कौतुक करताना पालकांनीही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कारण, जर मुलांची जास्त प्रशंसा केली गेली तर ते अतिआत्मविश्वासू बनू लागतात आणि त्यांच्या पालकांच्या प्रेमाचा फायदा देखील घेऊ शकतात. अशा परिस्थितीत पुढच्या वेळी मुलांचे कौतुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

मुलांची नाही तर त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा

जेव्हा जेव्हा तुमचे मूल कोणत्याही कठीण कामासाठी कठोर परिश्रम करते किंवा एखादे नवीन काम शिकण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या वेळी नक्कीच त्याचे कौतुक करा. परंतु, मुलाला तो सर्वोत्कृष्ट आहे हे सांगण्याऐवजी, त्याने केलेले प्रयत्न आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत हे त्याला समजावून देण्याचा प्रयत्न करा. जर मुल आपली खोली साफ करत असेल किंवा त्याचे वेळापत्रक पाळायला शिकले तर त्याला सांगा की, या गोष्टी त्याला शिस्त शिकण्यास कशी मदत करतील. यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढणार नाही. पण त्याला साफसफाईचे महत्त्व कळेल. 

इतरांसमोर बढाई मारू नका

आपल्या मुलाने लोकप्रिय व्हावे आणि त्याच्या चांगल्या सवयींबद्दल इतरांकडून प्रशंसा मिळवावी अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. परंतु, यासाठी मुलाची जास्त प्रशंसा करू नका. इतरांसमोर मुलाला 'जिनियर', 'हुशार', 'स्मार्ट' वगैरे म्हणू नका. मुले इतरांसमोर केलेल्या स्तुतीचा चुकीचा फायदा घेऊ शकतात आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास चुकीच्या मार्गाने आणि खूप वाढू शकतो.

अतिशयोक्ती करू नका

काही पालकांना आपल्या मुलाबद्दल इतरांशी बोलताना खोटी प्रशंसा करण्याची सवय असते. असे केल्याने मुले त्यांच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि शहाणे होतात आणि ही सवय मोठी झाल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनू शकते.

इतर मुलांशी तुलना करू नका

एका मुलाला दुसऱ्यापेक्षा चांगले किंवा गुणी असे सांगणे ही मोठी चूक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अशा तुलनात्मक स्तुतीचा दोन्ही मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मुलाला इतर मुलांच्या चांगल्या सवयी शिकू द्या आणि तुमच्या मुलाने दुसऱ्या मुलामध्ये लक्षात घेतलेल्या चांगल्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करा.