मुलांची छोटी-छोटी कामं आपणच करणे हे प्रेम नाही! जया किशोरींच्या 5 Parenting Tips

Jaya Kishori Parenting Tips: अनेकदा पालकांच्या चुकीच्या वागण्याने मुलांना स्वावलंबन हा गुण आत्मसात करणे कठीण होते. अशावेळी जया किशोरी काय सांगतात, ते जाणून घ्या? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 24, 2024, 03:54 PM IST
मुलांची छोटी-छोटी कामं आपणच करणे हे प्रेम नाही! जया किशोरींच्या 5 Parenting Tips title=

Jaya Kishori Parenting Tips: मुलांचं संगोपन करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपण ज्या बाळाला जन्म दिला त्याला चांगली शिस्त लागावी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पालकांना खास करुन लहान मुलांसमोर विशेष लक्ष देऊन वागावं लागतं. कारण मुलं पालकांनाच आपला आदर्श मानतात. आणि तशाच गोष्टी फॉलो करतात. पालकही माणूस आहे त्यामुळे अनेकदा कामाच्या ओघात किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्याने ते ही चुकू शकतात. अशावेळी जया किशोरी यांनी दिलेल्या टिप्स फॉलो करणे अत्यंत गरजेचे आहे. 

चुकीच्या सवयींना पाठींबा देणे 

मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांची प्रत्येक कृती ही बाललिला वाटू शकतात. अनेकदा पालकच अशा चुकीच्या सवयींना पाठिंबा देतात. मुलांना ओरडण्यापेक्षा त्या पाठिंबा देतात. यामुळे मुलं बिथरतात आणि चुकीच्या गोष्टी करतात. पण मुलांना स्वावलंबी करायचं असेल तर काही सवयी रोखल्या पाहिजेत. 

कंटाळा आला की फोन देणे

अनेकदा पालक थकतात. अशावेळी ते मुलांच्या एलर्जीला मॅच करु शकत नाही. अशावेळी पालक कंटाळा आला की, मुलांना हातात मोबाइल देतात. यामुळे मुलं स्वावलंबी न होता ते पालकांवर अवलंबून असतात. त्यामुळे अशावेळी मुलांना तुम्ही ऐकट्याने खेळायला शिकवला पाहिजे. 

मुलांना खोटं बोलण्यापासून वाचवा 

पालकांनी मुलांना खोटं बोलण्यापासून कायम रोखणं गरजेचं आहे. कारण अनेकदा पालक छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण हे करु नका कारण यामुळे मुलं स्वावलंबी होत नाही. परिस्थिती हाताळत नाही. मग ही मुलं मोठी झाल्यावरही खोटं बोलतात. 

संकटांना सामोरं जावू द्या 

मुलांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवण्याची संधी द्या. यामुळे त्यांना भविष्यात त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात मदत होऊ शकते. मग ते गणिताचे सूत्र असो किंवा खेळणी तोडून एकत्र करणे. त्याला जास्त प्रतिबंधित करू नका. अशा प्रकारे, प्रत्येक प्रकारचे आव्हान स्वीकारण्यात आणि पूर्ण करण्यात त्यांना त्रास होत नाही.

स्किन टाईम मर्यादित ठेवा

स्क्रीन टाइम कमी करा, जेव्हा मुले स्क्रीन व्यतिरिक्त इतर कामात व्यस्त राहतात तेव्हा त्यांची संज्ञानात्मक वाढ सुधारते. मुलांना पुस्तक वाचन, कला, हस्तकला, ​​प्राणीसंग्रहालयात जाणे, संग्रहालय, खेळ इत्यादींमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करा.

मनोबल वाढवा

जेव्हा मुले आनंदी असतात आणि त्यांना माहित असते की त्यांच्यावर प्रेम करणारे बरेच लोक आहेत, त्यांचे मनोबल नेहमीच वाढते आणि त्यांना पराभवाची भीती वाटत नाही. ते प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात. अशावेळी पालकांनी कायम त्यांचं मनोबल वाढवून त्यांना सक्षम करा.