सोशल मीडियाचा आपल्या सगळ्यांवर खूप मोठा प्रभाव आहे. तुम्हाला देखील याचा अनुभवव आला असेल. सोशल मीडियाचा वापर मनोरंजन करण्यासाठी केला जातो. पण अनेकदा या सोशल मीडियावर आपण आपलं नातं अवलंबून ठेवतो.
सोशल मीडियावरचे रील्स पाहिल्याशिवाय अनेक लोकांना अक्षरशः झोप येत नाही. अनेकजण रील्समध्ये जे दाखवलं जातं त्याच्याशी आपल्या खासगी आयुष्याची तुलना केली जाते. अगदी 'रिलेशनशिप टेस्ट' देखील केली जाते. यामध्ये अनेक चाचण्या केल्या जातात. जसे की, 'नेम अ वूमेन' आणि 'हसबंड टेस्ट' यासारख्या गोष्टी अगदी मस्करी मस्करीत तुलनात्मक केली जाते. खरं म्हणजे हे चुकीचे असून याचा तुमच्या जीवनावर विपरित परिणाम होतो.
सोशल मीडियावर अनेकदा नातं तपासून घेण्याचा ट्रेंड असतो. त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर जर तुम्ही तुमचं नातं तपासत असाल तर आताच थांबा. कारण त्यांनी दिलेली परिस्थिती आणि व्यक्तिमत्त्व ही वेगळी असतात. तसेच त्या व्यक्तीची नोकरी, पगार, संस्कार, अनुभव आणि मानसिकता वेगळी असते. या सगळ्यावर तुम्ही तुमचं नातं निभावू नका.
अनेकदा सोशल मीडियावरच्या गोष्टींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो पण तसं करणं चुकीचं आहे. कारण तुम्ही सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यास नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकते. रिलेशनशिप टेस्टचा परिणाम नकारात्मक आल्यास त्या नात्यामध्ये कटुता निर्माण होते. आपण आपलं संपूर्ण नातंच सोशल मीडियावर अवलंबून ठेवतो. याचा गैरफायदा इतर व्यक्ती घेऊ शकते.
नात्यामध्ये समर्पण महत्त्वाचं आहे. तुमचं नातं किती महिन्यांचं आहे की वर्षांचं हे महत्त्वाचं नाही. तर ते तुम्ही कसे हाताळता हे महत्त्वाचे आहे. नात्यामध्ये समर्पण अतिशय महत्त्वाचं आहे. नात्यामध्ये एकमेकांना सन्मान आणि प्रेम देणं अत्यंत गरजेचं आहे. नातं हे असं सोशल मीडियाच्या नियमांवर कधीच अवलंबून नसावं. कारण त्यामध्ये भावनिक गुंतागुंत नसते.
तुमचे नाते चांगले चालले आहे किंवा वाईट टप्प्यातून जात आहे. यासाठी सोशल मीडिया हे त्याचे मोजमाप ठरु शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या नात्यात काही समस्या येत असतील तर तुमच्या पार्टनरशी थेट बोला आणि कोणतीही भीती न बाळगता तुमची बाजू मांडा. जर एखाद्या गोष्टीबद्दल तो तुमच्यावर रागावला असेल, तर भांडणासाठी नवीन निमित्त शोधण्यापेक्षा ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
रिलेशनशिप समुपदेशक अनेकदा सांगतात की, नात्याचे वय कितीही असो, तुमचे नाते विश्वासावर आधारित असते. आजच्या रिलेशनशिप टेस्टमध्ये नापास झाल्याचा अर्थ असा नाही की तुमचे नाते कमकुवत आहे. जास्त काळ टिकणार नाही किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला फसवेल असा विचार तुमच्या मनात आला आहे. हे सर्व तुमच्या मनाचे भ्रम आहेत. जे या नातेसंबंधांच्या चाचण्या तुमच्या मनात ठेवतात.