भारतीय समाजात मुलांचं कतृत्व हे त्यांच्या बोर्डातील परीक्षांच्या निकालावर अवलंबून असतं. वर्षानुवर्षे ही परंपरा, हा विचार समाजात रुजवला जातो. शेजारच्या मुलाला किती गुण मिळेल किंवा आपलं मुलं त्याचे मार्क्स कमी आले, कसं नापास झालं यावर पालक कायमच तुलनात्मक चर्चा करतात. अशावेळी मुलाच्या मनाचा आणि त्याच्या भावनांचा विचार केला जात नाही. जर आपलं मुलं कोणत्या कारणाने परीक्षेत नापास झालं. तर त्याच्यावर न रागावता, न चिडता काही गोष्टी ठरवून करणे गरजेचे आहे.
जर तुमचं मुलं परीक्षेत नापास झालं तर त्याला ओरडण्यापेक्षा त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. परीक्षेत नेमकी त्याला कोणती गोष्ट कठीण वाटलं. मुलाशी मोकळेपणाने संवाद साधून त्याच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न करा. कारण ही भीती वाढू शकते. ज्याचा भविष्यात दुष्परिणाम होईल.
जर तुमच्या मुलाला परीक्षेत कमी टक्के मिळाले किंवा ते नापास झालं तर ही गोष्ट सुधारण्यासाठी काय करावे, हा प्रश्न मुलालाच विचारा. कारण यामुळे मुलामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. एवढंच नव्हे तर यामुळे मुलं देखील आपल्या अपयशावर, आपलं नेमकं काय चुकलं यावर दोन वेळा विचार करेल.
परीक्षेत मुलाच्या अपयशामुळे त्याच्या आत्मविश्वासालाही धक्का बसतो, ज्यातून सावरणे प्रत्येक मुलासाठी सोपे नसते. त्यामुळे परीक्षेत नापास झालेल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा प्रवास संपलेला नसून आता नव्याने चांगल वेळ आली आहे, हे तुम्ही त्यांना सांगावे.
जर तुमचा मुलगा परीक्षेत नापास झाला असेल तर त्याला काळजी करू नका असा सल्ला द्या कारण अपयश कधीही त्याच्या भविष्याचा मार्ग मोकळा करत नाही. अडखळल्यानीच माणूस शहाणा होतो आणि ज्यांनी आयुष्यात अनेक अपयश पाहिले त्यांनाच यशाची चव कळते.
जर तुमचा मुलगा परीक्षेत नापास झाला असेल किंवा त्याचे मार्क्स कमी असतील तर यावर तुमची नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्याला सांगा की तुम्ही त्याच्यावर नाखूश नाही आणि तुम्ही कधीच असू शकत नाही. यामुळे मुलांमधील हरवलेला विश्वास पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि त्यांच्यात नवा उत्साह निर्माण होईल.