How to make Dahi Vada: हिंदू धर्मात करवा चौथ या सणाला खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात जसं वट पौर्णिमा असते तसेच उत्तर भारतात करवा चौथ असतो. हा सण विवाहित महिलांसाठी हा एक महत्त्वाचा सण आहे. या सणाला विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. यंदा करवा चौथ हा सण 20 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या काळात महिला दिवसभर काहीही न खाता-पिता निर्जला व्रत करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यानंतर रात्री चंद्र पाहून उपवास तोडला जातो. अशा स्थितीत रात्री उपवास सोडताना काहीतरी चटपटीत खाण्याची तल्लफ होते. जर तुम्हालाही उपवास सोडल्यानंतर काहीतरी गोड-आंबट खावेसे वाटत असेल, तर तुम्ही हा दही-वडा करू शकता. याचसाठी आज आम्ही तुम्हाला दही वडा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.