भारतीय संघाने फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्या टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावावरुन केली. भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला. फायनलमध्ये बुमराहने 2 विकेट घेतल्या तर बुमराहने 'प्लेअर ऑफ द सीरीज' हा किताब पटकावला.
बुमराह वेगवेगळे रेकॉर्ड करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण यासोबतच वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी बुमराहची मैदानातील कृती ही प्रेक्षकांचं मन जिंकणारी होती. बुमराहने आपल्या विजयाचा आनंद पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगदसोबत साजरा केला.
बुमराहने टी 20 वर्ल्ड कपच्या विजयाचा आनंद आपल्या खेळाडूंसोबत साजरा केलाच. पण त्याला मिळालेलं मेडल 9 महिन्यांच्या अंगदच्या गळ्यात घालून हा आनंद साजरा केला. टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू या क्षणाला आपल्या कुटुंबियांना आठवत होतं. कारण हा आनंद प्रत्येकासाठी खास होता. बुमराहचा मुलगा 4 सप्टेंबर 2023 रोजी जन्मला असून तो अवघ्या 9 महिन्यांचा आहे.
आपल्याला माहितच आहे, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही प्रेझंटर आहे. पत्नीशी प्रोफेशनली गप्पा मारल्यानंतर मुलाखतीनंतर बुमराहने पत्नी संजनाला मिठी मारून व्यक्त केला आनंद. बुमराहने 2021 मध्ये संजनासोबत विवाह केला.
संजनाशी मोकळेपणाने बोलताना बुमराह म्हणाला की, भारताने तब्बल 13 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. तुला कसे वाटत आहे? बुमराह म्हणाला, "आम्ही नर्व्हस होतो पण आता आम्हाला बरे वाटत आहे." जिंकण्याचा हा मार्ग. हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. वडील म्हणून इथे हा विजय मिळवला याचा खास आनंद आहे. स्पर्धेत असे योगदान देताना खूप छान वाटले. आम्ही खूप शांतपणे खेळलो. आम्ही नाराज नव्हतो. संजनाने त्याला पुढे विचारले, “शेवटच्या षटकात तू, अर्शदीप आणि हार्दिकने अप्रतिम गोलंदाजी केल्याचे दिसले. या मागचा विचार काय होता? यावर जसप्रीत बुमराह म्हणाला, “आम्ही खूप आत्मविश्वासाने होतो. त्यांनी घातलेली विविधता अप्रतिम होती.
बुमराहची खेळानंतरची मैदानावरची कृती प्रत्येकालाच भावली. मुलगा अंगद आणि पत्नी संजनासोबत मैदानावर घालवले खास क्षण चर्चेचा विषय ठरले. आपल्या विजयाचा आनंद साजरा करणारा जसप्रित बुमराह हा Complete Family Man ठरला.