Historial And Indian Princess Name for Baby : अनेक दाम्पत्य अगदी लग्न झाल्यावरच बाळाच्या नावाचा विचार करतात. कारण प्रत्येकासाठी आपलं मुलं हे अतिशय खास असतं. अशावेळी पालक मुलासाठी अगदी हटके आणि युनिक नावांचा विचार करतात. अशावेळी काही जणांना ऐतिहासिक आणि राजघराण्याशी संबंधित जो़डलेले नाव आकर्षित करतात. आपल्या मुलाचं नाव भारदस्त असावं असं वाटतं. त्यांच्यासाठी ही नावांची खास यादी.
यशवर्धन हे नाव अतिशय भारदस्त आहे. यशवर्धन हे एका हिंदू मुलाचे नाव आहे ज्याचा अर्थ "जो त्याच्या सद्भावनेने सर्वत्र पसरलेला आहे." हे संस्कृत शब्द "यश", म्हणजे "प्रसिद्धी" आणि "वर्धन," म्हणजे "वाढ" यांचे संयोजन आहे. नावाचा अर्थ "जो प्रसिद्धी वाढवतो" असा देखील केला जाऊ शकतो. यशवर्धन हे नाव हिंदू देव विष्णूशी देखील संबंधित आहे, ज्याला विश्वाचा "संरक्षक" म्हणून ओळखले जाते.
प्रिन्स हे नाव प्रामुख्याने लॅटिन वंशाचे पुरुष नाव आहे ज्याचा अर्थ रॉयल सन असा होतो. जोडाक्षरी असलेले हे नाव आहे अतिशय खास.
जगातील विजेता, विश्वासू असं या "विश्वजीत' या नावाचा अर्थ आहे. हे नाव भारतातील ऐतिहासिक घराण्यातील नाव आहे. अंकशास्त्रानुसार 5 अंक हा शुभांक आहे.
'धैर्यशील' हे चार अक्षरी नाव असून खूप खास ऐतिहासिक आहे. अतिशय खसा असा याचा अर्थ आहे. साहस आणि धैर्य असे या नावाचे अर्थ आहे. शुभांक 6 असा आहे.
राजदीप हे अतिशय युनिक नाव आहे. ऐतिहासिक आणि जबरदस्त असं हे नाव असून याचा अर्थ राज्याचा दिपक. या नावाचा शुभांक 5 असा आहे.
जयदीप हे नाव विजेता आणि प्रकाश विजय असा याचा अर्थ आहे. अंकशास्त्रानुसार जयदीप या नावाचा शुभांक 2 असा आहे. या नावाचा विचार देखील तुम्ही मुलासाठी करु शकता.
तेजस नाव मराठीत अर्थ तेज; चमक हे मुलासाठी चांगले मराठी नाव आहे आणि मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते.
वीर नावाचा मराठीत अर्थ शूर असा होतो. हे मुलासाठी चांगले मराठी नाव आहे आणि मुलाच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते.
राजवर्धन' या नावाचा अर्थ आहे राजाचा राजा. हे नाव अतिशय ऐतिहासिक आणि जबरदस्त आहे. ७ असा या नावाचा शुभांक आहे.
शौर्य नावाचा मराठीत अर्थ शूर किंवा प्रसिद्धी; शौर्य हे मुलासाठी चांगले मराठी नाव आहे आणि मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते.
विक्रम हे हिंदू मुलाचे नाव आहे आणि ते अनेक अर्थ असलेले हिंदी मूळ नाव आहे. विक्रम नेम मराठीत अर्थ शौर्य; शौर्याचा सूर्य; भगवान हनुमान; आश्चर्यकारक; विक्रम. विक्रम नावाचा मराठीत अर्थ, लोकप्रियता आणि रँक आहे आणि विक्रमसाठी भाग्यवान क्रमांक 11 आहे.