आठवडाभर नव्हे, तर तब्बल तीन महिने टोमॅटो साठवू शकता, वापरा ही किचन ट्रिक

Tomato Storage Tips in Marathi: अनेकदा भाजीच्या दरात चढ-उतार होत असतात. जेव्हा कमी दरात भाजी उपलब्ध होते त्यावेळीस आपण शक्य होईल तितका साठा करुन ठेवतो. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने शंभरी पार केली होती. अशावेळी जर तुम्हाला टोमॅटोचा साठा करुन ठेवायचं असेल तर, यासाठी काय करावे लागलं ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 24, 2024, 03:28 PM IST
आठवडाभर नव्हे, तर तब्बल तीन महिने टोमॅटो साठवू शकता, वापरा ही किचन ट्रिक title=

Kitchen Tips and Tricks News In Marathi: गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव  140 रुपयांचा आसपास पोहोचला होता. यामुळे प्रत्येक गृहिणीचं बजेट कोलमडले होते. त्यानंतर आता जरी 40 ते 50 रुपयांत एक किलो टोमॅटो उपलब्ध होत असेल तरी अनेक गृहींणी या आधीच जास्तीचा टोमॅटो घरी आणून ठेवतात. टोमॅटो हा पौष्टिक गुणधर्म असलेला खाद्यपदार्थ मानला जातो. अनेकदा टोमॅटोचे भाव वाढतात आणि अशा परिस्थितीत टोमॅटो खरेदी करायचे की नाही? असा प्रश्न पडतो? 

अनेकांना असे वाटते की, टोमॅटो हा कांद्याप्रमाणे फार काळ टिकत नाहीत. टोमॅटो तीन-चार दिवसांनी खराब होतात. म्हणून अनेकजण गरजेनुसार लोक टोमॅटो खरेदी करतात. पण खरचं टोमॅटो जास्त दिवस साठा करु शकतो का? तर याचे उत्तर आहे हो... टोमॅटो एका खास पद्धतीने साठा केला तर तुम्ही टोमॅटो फक्त 20-25 दिवसांसाठीच नव्हे तर तीन महिन्यांसाठी साठ दिवस ठेवू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या... यूट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सांगितली ही टोमॅटो जास्त काळ कसे साठवून ठेवू शकतात. 

टोमॅटो महिनाभर कसे साठवू शकता ते जाणून घ्या...

सुरुवातीला एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि नंतर त्यात मीठ आणि हळद घाला. त्या पाण्यात टोमॅटो टाका. टोमॅटो असेच अर्धा तास ठेवून द्या. अर्धा तासानंतर टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर टोमॅटो चांगले पुसून घ्या. पुसून घेतलेला प्रत्येक टोमॅटो हा पेपरमध्ये गुंडाळा. न्यूजपेपरणी टोमॅटो पूर्णपणे झाकून घ्या. सर्व गुंडाळून ठेवलेले टोमॅटो एका भांड्यात ठेवा आणि ते भांड बंद कपाटात ठेवा.

काळजी घ्या, या टोमॅटोवर तीन महिने सूर्यप्रकाश पडला नाही पाहिजे. आठवड्यातून एकदा या टोमॅटोवरील वर्तमानपत्र काढून त्यातील पीकलेला टोमॅटो काढून वापरण्यासाठी घ्या. टोमॅटो पिकले की ते इथलिन गॅस तयार करतात या गॅसमुळे इतर टोमॅटोंवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे पिकलेले टोमॅटो तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून वापरू शकता.