शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला, 'तूच सगळा..'

IPL 2024 KKR Win Title Shah Rukh Khan Gautam Gambhir: केकेआरने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर मैदानात सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या शाहरुखने गौतम गंभीरला कडकडून मिठी मारली.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 27, 2024, 12:29 PM IST
शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला, 'तूच सगळा..' title=
शाहरुखची गंभीरचा ऑफर

IPL 2024 KKR Win Title Shah Rukh Khan Gautam Gambhir: कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 चं जेतेपद पटकावलं आहे. मात्र या वर्षीच्या आयपीएलमधील केकेआरचा जेतेपदापर्यंतचा प्रवास सुखकर करण्यामागील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरली ती म्हणजे केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर! जेतेपद पटकावल्यानंतर जवळपास प्रत्येक खेळाडूने 'जीजी' सर म्हणत गौतम गंभीरमुळे संघात अमुलाग्र बदल झाल्याचं आवर्जून नमूद केलं. एकेकीडे गंभीरमुळे कोलकात्याला तिसऱ्यांदा जेतेपद पटकावता आलं असतानाच दुसरीकडे आता गंभीर थेट भारतीय क्रिकेटच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गंभीरने ही मोठी जबाबदारी स्वीकारली तर तो केकेआरपासून दूर जाईल. मात्र असं होऊ नये अशी कोलकात्याचा मालक अभिनेता शाहरुख खानची मनापासून इच्छा आहे. त्यामुळेच त्याने गौतम गंभीरला अंतिम सामना होण्याआधीच एक अविश्वसनीय ऑफर दिली आहे.

गंभीरने केकेआरची साथ सोडली तर..

कोलकात्याच्या संघाला सहमालक असलेल्या शाहरुख खानने गौतम गंभीरच्या हातात एक ब्लँक चेक दिल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठीचा शोध सुरु असून गंभीरचा यासाठी विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा असतानाच गंभीरने कोलकात्याच्या संघाबरोबर पुढील किमान दहा वर्ष तरी रहावं अशी शाहरुखची इच्छा आहे. यासाठी तो गंभीरला वाटेल ती रक्कम देण्यास तयार आहे. मात्र दुसरीकडे बीसीसीआयने गौतम गंभीरला भारतीय प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे गौतम गंभीरही ही आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. मात्र या साऱ्यामध्ये कोलकात्याने यंदाच्या वर्षी थेट जेतेदपदापर्यंत मजल मारण्यासाठी उभारलेला सेटअप बिघाडण्याची शक्यता आहे.

आयपीएल जिंकण्याआधीच ऑफर

मागील तीन पर्वांमध्ये गंभीरने मेंटॉर म्हणून वेगवेगळ्या संघांबरोबर उत्तम काम केलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचा मेंटॉर असताना त्याने या नव्या संघाला प्लेऑफपर्यंत नेलं होतं. तो यंदाच्या वर्षी कोलकात्याबरोबर होता. सुनील नरीनला सलामीवीर म्हणून उतरवणं, नवीन खेळाडूंना संधी देणं यासारख्या प्रयोगांमुळे यंदाच्या स्पर्धेत केकेआरने थेट जेतेपदावर नाव कोरलं. विजयानंतर शाहरुखने अगदी घट्ट मिठी मारत गंभीरचं कौतुक केलं. त्याने त्याच्या कपाळाचं चुंबनही घेतल्याचं पाहायला मिळालं. आता शाहरुखला गंभीरने संघ सोडावं असं वाटतं नसून त्यासाठी त्याने गंभीरला स्पेशल ऑफर जेतेपद पटकावण्याआधीच दिली आहे.

नक्की वाचा >> काव्या मारनचा ब्रॉयफ्रेण्ड कोण? तिघांशी जोडलं जातंय नाव; पंत, संगीतकार अन् 'हा' फलंदाज

शाहरुखच्या परवानगीची गरज

'दैनिक जागरण'ने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीरने भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी इच्छूक असल्याचं संकेत दिले आहेत. आपली निवड होईल असं आश्वासन देण्यात आलं तरच आपण प्रशिक्षक पदासाठी अर्ज करु असं गंभीरने म्हटलं आहे. कोलकात्याच्या अंतिम सामन्यानिमित्ताने गंभीर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चेन्नईमध्येच भेट घेऊन प्रशिक्षकपदासंदर्भातील चर्चा करणार असल्याची शक्यताही सामन्याच्या पूर्वीच व्यक्त करण्यात आलेली. मात्र भारताचा प्रशिक्षक व्हायचं असेल तर आधी गंभीरला केकेआरचं मेंटॉर पद सोडावं लागणार आहे. यासाठी त्याला शाहरुख खानच्या परवानगीची गरज असणार आहे.

शाहरुख चेक देत म्हणाला...

शाहरुखच्या परवानगीशिवाय गंभीरला केकेआरपासून वेगळं होता येणार नसल्याचा उल्लेख करत 'दैनिक जागरण'ने शाहरुखने गंभीरला ब्लँक चेक दिला आहे. वाटेल ती रक्कम मोजून शाहरुख गंभीरला संघाबरोबरच ठेवू इच्छितो असं या वृ्तात म्हटलं आहे. 'तूच केकेआरचा सगळा कारभार पुढील दहा वर्षांसाठी बघ' असंही शाहरुखने गंभीरला सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (27 मे 2024) भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.