नातं निर्माण करायला अनेक वर्ष जातात पण नातं तुटण्यासाठी एक क्षणही पुरेसा ठरतो. त्यामुळे प्रत्येक नात्याला योग्य पद्धतीने समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक नातं हे चांगल्याच पद्धतीने सांभाळले गेले पाहिजे, जे तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहेत त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. पती-पत्नीचं नातं देखील तसंच आहे. ज्यामध्ये कधी नोक-झोक तर कधी प्रेम-वाद असतोच पण ते टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे.
अशावेळी घटस्फोट होण्यामागचं कारण काय हे समजणे कठीण होते. मोटिवेशनल स्पिकर सिस्टर शिवानी यांनी एका व्हिडीओमध्ये लग्न आणि घटस्फोट याबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. सिस्टर शिवानी यांचं म्हणणं आहे की, आजच्या काळात आपण जर कोणत्या जोडप्यांना भेटलो तर त्यांच्या मनात विभक्त होण्याच्याच गोष्टी असतात. 5 ते 10 वर्षांपूर्वी खूप मोठं कारण असेल तरच घटस्फोट घेतला जात असे. पण आता घटस्फोट घेण्यामागे 'काहीच' कारण नसतं.
तसेच हे कपल पुढे सांगते की, या नात्यामध्ये काहीच मिळत नाही म्हणून आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर आपण नात्यामधून आपल्याला काहीच मिळत नाही, असा विचार करत असाल तर हा विचार थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.
जरी लोक लग्नाला नशिबाशी जोडत असले तरी सत्य हे आहे की, लग्न करायचं किंवा न करायचं हा निर्णय माणसाचा स्वतःचा असतो. सिस्टर शिवानी सांगते की लग्न हे आपल्या संस्कार आणि कर्माशी निगडीत आहे. विवाहाच्या पवित्र बंधनात दोन लोक एकत्र येणे हे त्यांच्या कर्माच्या पद्धतींचा परिणाम आहे. हा नशिबाचा एक भाग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही बदल करू शकता, परंतु तुमच्या श्रद्धा आणि चिंतांमुळे तसे करण्याचा प्रयत्न करू नका.
सिस्टर शिवानी सांगतात की, ज्याप्रमाणे दोन व्यक्तींच्या भेटीचा संबंध नशिबाशी असतो. त्याचप्रमाणे त्यांच्या विभक्त होण्यातही नशिबाची भूमिका असते. परंतु आज आपल्या कृती सुधारून ते पूर्णपणे बदलले जाऊ शकते. कारण नियती हा एक रोडमॅप आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मार्ग बनवावा लागतो. अशा परिस्थितीत, आपण आपल्या कृतींबद्दल जागरूक राहून ते अधिक चांगले करू शकता.