Ambani Family Antilia : जगातील सगळ्यात जास्त महागड्या घरांमध्ये एक म्हणजे अॅन्टिलिया आहे. हे अॅन्टिलिया भारतातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचं आहे. या 26 मजल्याच्या इमारतीत मुकेश अंबानी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब म्हणजेच पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश अंबानी, त्याची पत्नी श्लोका अंबानी, अनंत अंबानी आणि त्याची पत्नी राधिका मर्चेंट राहतात. त्यासोबत आकाश आणि श्लोकाची मुलं पृथ्वी अंबानी आणि वेदा अंबानी देखील आहेत. जेव्हा अंबानी कुटुंब 2012 मध्ये अॅन्टिलिया मध्ये रहायला आले. तेव्हा त्या घराची किंमत ही जवळपास 15 हजार कोटींपेक्षा जास्त होती. अॅन्टिलिया नेहमीच चर्चेत असण्याचं कारण मोठ्या जल्लोषात करण्यात येणाऱ्या पार्टी आणि अनेक गोष्टी आहेत.
अॅन्टिलियाचं नाव हे अटलांटिक महासागरात स्थित असलेल्या फॅन्टम आयर्लंडवरून प्रेरित आहे. अॅन्टिलिया दाक्षिणाच्य मुंबईत स्थित आहे. यात तीन हॅलीपॅड देखील आहेत. सगळ्यांनाच अॅन्टिलिया आत कसं असेल हे जाणून घेण्याची इच्छा आहे. मात्र, त्यातील कोणतेही फोटो अजून समोर आलेले नाही. त्याविषयी इतकीच माहिती आहे की हे घर 37 हजार स्क्वेअर मीटरवर पसरलं आहे. तर या घराची उंची ही 173 मीटर आहे. तर या घरात मल्टी-स्टोर कार पार्किंग आहे. 9 हाय स्पीड लिफ्ट आणि स्टाफसाठी विशेष सूट देखील आहे.
दरम्यान, डीएनएच्या रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंब हे त्यांच्या या शाही घराच्या 26 व्या मजल्यावर राहतं. मग यात फक्त मुकेश अंबानी आणि नीता अंबानी नाही आहेत. तर त्यांची मुलं आनंद, अनंत दोघेही त्यांच्या पत्नीसोबत राहतात. तर आनंद आणि श्लोकाची मुलं देखील त्यांच्यासोबत राहतात. दुसरीकडे टाइम्स नाव हिंदीच्या एका माहितीनुसार, कथितपणे नीता अंबानीनं इतक्या वरती राहण्याचा निर्णय यासाठी घेतला की घराच्या प्रत्येक खोलीत सूर्य प्रकाश आणि हवा येईल. असं देखील म्हटलं जातं की अॅन्टिलियाच्या 26 व्या मजल्यावर जवळच्या लोकांनाच जाण्याची परवानगी आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब हे अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये होते. आता ते जवळपास महिनाभरासाठी न्युयॉर्कमध्ये लग्नानंतरच्या पोस्ट वेडिंगसाठी पोहोचले आहेत.