गुड लूक्सच नव्हे, तर मॅडी एक उत्कृष्ट जोडीदार अन् पालकही; 'हे' आहेत त्याचे 5 लाखामोलाचे गुण

तरुणाईंच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता आर माधवन याचा आज वाढदिवस. 1 जून 1970 रोजी जन्मलेला आर माधवन आज 54 वर्षांची झाली आहे. आजही आर माधवनचं क्रेझ तेवढंच आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 1, 2024, 03:11 PM IST
गुड लूक्सच नव्हे, तर मॅडी एक उत्कृष्ट जोडीदार अन् पालकही; 'हे' आहेत त्याचे 5 लाखामोलाचे गुण title=

बॉलिवूड अभिनेता आर माधवन याच्या क्यूट स्माइलच्या आजही अनेक मुली दिवान्या आहेत. त्याने आपल्या पहिल्याच चित्रपटाने लाखो मुलींना वेड लावले होते. आर माधवनच्या डिंपल स्माईलपासून ते त्याच्या अभिनयापर्यंतच्या सगळ्या गोष्टी अनेकांना आवडतात. आर माधवनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

तो एक उत्तम कलाकार, उत्तम माणूस तर आहेच पण सोबतच तो एक खंबीर जोडीदार आणि तर परफेक्ट बाबा. आर माधवनने आपल्या खासगी जीवनातील अनेक घटनांनी किंवा अनुभवांनी आपलं वेगळेपण जपलं आहे. 

आर माधवन लव्हस्टोरी 

आर माधवनची लव्हस्टोरी आपल्याला माहितच आहे. आर माधवनच्या पत्नीचं नाव सरिता बिर्जे असं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी मिळवल्यानंतर अभिनेत्याने पब्लिक स्पीकिंग क्लासेस देण्यास सुरुवात केली. कोहलापूर येथे एका कार्यशाळेदरम्यान त्यांची सरिता बिर्जे यांच्याशी भेट झाली. त्यांना सरिता बिर्जे खूप आवडली.

खंबीर जोडीदार 

आर माधवन आणि सरिता बिर्जे यांचं नातं अतिशय खास आहे. आर माधवनने पत्नीला दिलेली साथ कौतुकास्पद आहे. नात्यामध्ये विश्वास अतिशय महत्त्वाचा असल्याच आर माधवन आणि सरिता आपल्या नात्यातून दर्शवला आहे. एवढंच नव्हे तर नात्यामध्ये पारदर्शकता हवी असल्याचं आर माधवन सांगतो. 

पत्नीसाठी खास गोष्ट

आर माधवन म्हणतो की, लग्नाला एवढी वर्षे झाल्यानंतर मी पत्नीला कधीच विचारत नाही की, ती कुठे जातेय आणि कधी येणार. नात्यामध्ये एकमेकांना स्पेस देणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासोबतच नात्यामध्ये भावनिक विचार न करता व्यवहारी असणे अत्यंत गरजेचे आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

परफेक्ट बाबा 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर माधवन हा परफेक्ट बाबा असल्याच त्याने अनेक उदाहरणातून स्पष्ट झालं आहे. आर माधवनचा मुलगा वेदांगने स्विमिंगमध्ये भरघोस यश मिळवलं आहे. आर माधवनने कधीच मुलावर अभिनय क्षेत्राचं दडपण निर्माण केलं नाही. त्यांनी त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली. 

नाळ जपली 

आर माधवन हा तामिळ ब्राम्हण आहे तर त्याची पत्नी कोल्हापूरमधील महाराष्ट्रीयन कुटुंबातील आहे. आर माधवनने कायमच आपल्या कुटुंबाची नाळ मातीशी घट्ट धरून ठेवली आहे. त्याने आपली संस्कृती जपून ठेवली आहे. अनेकदा पारंपरिक पूजा किंवा आहार घेताना आर माधवन आणि त्याचे कुटुंबीय दिसले आहे.