मुलांचं संगोपन करताना 5 गोष्टींची विशेष काळजी घेतात रितेश आणि जिनिलिया

Parenting Tips : रितेश आणि जिनिलिया हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोन्ही मुलांना या दोघांनी दिलेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. पालक म्हणून सगळ्यांनीच करावा विचार. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 13, 2023, 04:29 PM IST
मुलांचं संगोपन करताना 5 गोष्टींची विशेष काळजी घेतात रितेश आणि जिनिलिया  title=

Riteish Deshmukh And Genelia D'souza Parenting Tips : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसोझा ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी अनेक कपल गोल्स दिले आहेत. एवढंच नव्हे तर हे दोघे पालक म्हणून आपले वेगळेपण जपतात. या दोघांनी मुलांना दिलेल्या संस्काराचं अनेकदा सोशल मीडियावर दर्शन होतं. 

मुलांना जन्म देण्यासोबतच त्यांचे पालन-पोषण करणे तितकेच गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया आणि सगळ्याच गोष्टी इतक्या सहज उपलब्ध होत असताना. मुलांना या ग्लॅमरस जगापासून दूर ठेवायला हवं, असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. पण रितेश आणि जिनिलियाने यावर अनेक उपाय त्यांच्या कृतीतून दाखवले आहेत. 

गावाशी जोडून ठेवा 

पालक म्हणून पालकांनी मुलांची कायमच आपल्या मूळ मातीशी किंवा गावाशी नाळ जोडली पाहिजे. रितेश आणि जिनिलिया दोघांनी दोन मुलगे आहेत. हे अनेकदा आपल्या गावी म्हणजे लातूरमध्ये सुट्ट्या घालवताना दिसतात. आजोबा विलासराव देशमुख यांचा वारसा जपताना रितेशची मुलं दिसतात. अनेकदा विलासराव देशमुख यांच्या समाधीचे दर्शन घेतानाही दिसतात. 

कृतज्ञता 

रितेश जिनिलिया हे दोघेही कायमच सगळ्यांचे कृतज्ञ असतात. त्यांनी हेच संस्कार मुलांना दिले आहेत. ही दोन्ही मुले कायमच आपल्या आजी-आजोबांचे कृतज्ञ असताना दिसतात. त्यांच्यावर असलेले प्रेम व्यक्त करतात. कृतज्ञता हा गुण मुलांना अगदी लहानपणापासूनच शिकवावा. कारण यामुळे मुलांमध्ये प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण होते.

सोशल मीडिया

मुलांना सोशल मीडियामुळे खूप एक्सपोझर मिळत आहे. अशावेळी रितेश-जिनिलियाची मुले वेगळी ठरतात. कारण कधीही फोटोग्राफर पाहिल्यावर ही दोन्ही मुले त्यांना नमस्कार करताना दिसतात. सोशल मीडियाचा चांगला वापर केल्याचं इथे दिसून येतं. सोशल मीडिया हा कळीचा मुद्दा बनला आहे. यामुळे मुलं बिघडत असल्याचा कांगावा पालक करतात. पण जेव्हा रितेश जिनिलियाचे संस्कार पाहतो तेव्हा ते नक्कीच आत्मसात करण्यासारखे आहेत. 

सणांद्वारे करतात संस्कार 

आपल्या मुलांवर संस्कार करायचे असतील तर सण हे उत्तम दिवस असतात. आपल्या मुलांना कायम सण, उत्सव दाखवा. त्यामधील बारकावे शिकवा आणि हे रितेश-जिनिलया कायम करताना दिसतात. गणपतीच्या दिवसातील एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. अनेकदा संपूर्ण देशमुख कुटूंब दिवाळी साजरे करताना दिसतात. 

मुलांना देतात वेळ 

रितेश-जिनिलिया देखील इतर पालकांप्रमाणेच खूप व्यस्त असतात. पण असं असलं तरीही दोघंही मुलांना वळ देताना दिसतात. मुलं लहान असतात तेव्हाच त्यांना पालकांची जास्त गरज असते. रितेश आणि जिनिलिया हा नियम कटाक्षाने पाळतात.