दिवसेंदिवस जीवनशैली बदलत चालली आहे. फास्ट फूड ते लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत सगळ्याच गोष्टींबाबत मत बदलत चालली आहेत. यासोबत अगोदर लग्नानंतर एखादं मुलं असावं हा विचार आता मागे पडत चालला आहे. मुलं जन्माला घालणे गरजेचे आहेच का? प्रश्न विचारला जात आहे. न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ कोच Foodpharmer म्हणजे रेवंत हिम्मतसिंगका यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना मुलं जन्माला घालणं गरजेचंच आहे का?हा प्रश्न विचारला. या प्रश्नावर गुरुदेव यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे?
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात अनेक जोडप्यांना मुलं नको असं वाटतात. पण वयाच्या 40 ते 45 नंतर अनेक जोडप्यांना आपल्याला मुलं असावीत असं वाटतं. मात्र तोपर्यंत उशिर झालेला असतो. मुलं जन्माला न घालणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याचा आदरच केला पाहिजे.
अनेकदा कपल चाळीशीनंतर मुलांचा विचार करतात. अशावेळी नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहणे शक्य नाही. तेव्हा IFV किंवा Adoption ला प्राधान्य दिलं जातं. पण या दोन्ही पद्धती अतिशय खर्चिक आणि किचकट आहेत. एवढंच नव्हे या सगळ्याने तुम्हाला मुलाचा आनंद मिळेल की नाही यात शाशंकता असते. निसर्गाच्या विरोधात जाऊन वय वाढल्यानंतर मुलाचा विचार करणे जोखमीचे काम असते.
अनेकदा मुलं जन्माला घालण्याचा निर्णय उशिरा झाल्यामुळे पालक आणि मुलांमध्ये मोठा Age Gap दिसतो. अगदी पालकांचे वय 60 आणि मुलांचे वय 10 ते 15 वर्षे असतात. अशावेळी मुलं आणि पालक यांच्यात अनेक मतभेद निर्माण होतात. हे टाळण्यासाठी पालकांनी फॅमिली प्लानिंग योग्य वयात करणे गरजेचे आहे. अनेक कुटुंबांमध्ये या वयातील अंतरामुळे वाद होताना पाहिले आहेत. एवढंच नव्हे तर हे वयाचे अंतर मुलांवर खूप जबाबदाऱ्या घेऊन येतं. त्यांच्या खेळत्या वयात पालक अतिशय थकलेले असतात.
अनेक पालक मुलं जन्माला न घालण्याच्या विचारावर पक्के असतात. अशावेळी त्या मताचा आदर करणे गरजेचे आहे. पालकांनी अशावेळी आपला वेळ समाजसेवेत घालवावा. अनेक मुलांना आधाराची गरज असते. अशावेळी तुम्ही पालक नसलात तरी त्यांचा आधार होऊ शकतात.