'ब' अक्षरावरुन सुरु होणारी मुलींची स्टायलिश नावं आणि अर्थ

B Letter Girl Names in Marathi: पालक घरात मुलीचा जन्म झाला की, तिच्यासाठी अतिशय युनिक आणि स्टायलिश नावांचा शोध घेतात. अशावेळी 'ब' अक्षरावरुन Hindu मुलींची अतिशय स्टायलिश आणि युनिक नावे. यासोबत नावांचा अर्थ देखील घ्या समजून. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 9, 2024, 08:21 AM IST
'ब' अक्षरावरुन सुरु होणारी मुलींची स्टायलिश नावं आणि अर्थ  title=

B Letter Hindu Baby Girl Names List:  घरात बाळाचा जन्म झाला की, शोध सुरु होतो नव्या नावांचा. प्रत्येक पालकांना आपल्या बाळासाठी गोड आणि अतिशय युनिक नाव हवे असते. जर तुमच्या घरी चिमुकल्या तान्हुलीचं आगमन झालं असेल तर नव्या नावांचा शोध नक्की घ्या. कारण हिंदू धर्मात अनेक युनिक अशी नावे आहेत. अनेक पालक मुलांना खास अक्षरावरुन नाव ठेवण्याचा विचार करतात. कधी हे नाव जन्मपत्रिकेवरुन ठरवलं जातं किंवा कधी पालक एखादं अक्षर देऊन मुलीचं नाव ठेवण्याचा विचार करतात. अशावेळी जर तुम्ही 'ब' म्हणजे इंग्रजीतील 'B' या आद्याक्षरावरुन मुलीचे नाव शोधत असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. या नावांमध्ये हिंदू मुलींची अतिशय युनिक आणि ट्रेंडी नावे आणि त्याचा अर्थ पाहू शकता. 

B वरुन सुरु होणारी मुलींची नावे आणि अर्थ 

  • बंदिनी - जो एकत्र बांधतो, नैसर्गिक
  • ब्रुंधा - कोकिळा, गोड आवाज
  • बृंदा- हिंदू धर्मात तुळशीला वृंदा नावानेही ओळखले जाते. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तेव्हा तुम्ही 'बृंदा' या नावाचा देखील विचार करु शकता.
  • बिपाशा- नदी, घाट, अमर्याद
  • बिनिता- साधेपणाने, सहजतेने परिपूर्ण
  • बरीशा- शुद्ध, स्मित
  • बिनोदिनी- राधासारखी सुंदर आणि गोड
  • बबली- गोंडस, छोटी, सगळ्यांची आवडती
  • बरखा- पाऊस, रिमझिम
  • बरुणा- देवीचे नाव, समुद्राच्या पत्नीचे नाव देखील बरुणा आहे.
  • बिंदिया - मेकअप, कपाळावर सजलेली बिंदी, स्त्रियांच्या सोळा मेकअपमध्ये समाविष्ट आहे
  • बहुला-तारा, चमकणारा, प्रकाशमान

(हे पण वाचा - Mahashivratri 2024 : महादेवाच्या मुलांच्या नावांमध्येही दडलाय सुरेख अर्थ; तुमच्याही मुलांना द्या अशीच नावं)

 

  • बिनाया - संयमी, सभ्य, साधेपणाने परिपूर्ण
  • बबिता- लहान मुलगी, प्रेरणा, जिच्याकडून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे.
  • ब्रह्मी- देवी सरस्वतीचे नाव, ब्रह्मदेवाची पत्नी
  • बंदिता - उपासनेस पात्र, स्तुतीस पात्र, नेहमी स्तुती केली जाते

(हे पण वाचा - Womens Day : गोड परीसाठी 2024 मधील अतिशय सुंदर-मोहक नावे आणि अर्थ, A to Z अक्षरावरुन मुलींची नावे)

  • बहार - वसंत ऋतु, सकारात्मक ऊर्जा
  • बैसाखी- वैशाख महिन्यातील पौर्णिमा
  • बांधवी- जो कुटुंब आणि मित्रांवर प्रेम करतो
  • बियांका - पांढरा, निष्कलंक, कोणताही डाग नसलेला