सोशल मीडियावर करत असलेल्या 'या' चुका आणू शकतात तुमच्या नात्यात दुरावा!

How social media is unhealthy for relationship :  तुम्ही करता सोशल मीडियाचा अती वापर किंवा करतात या गोष्टी? तर न कळत तुमच्याही रिलेशनशिपवर होऊ शकतो वाईट परिणाम

दिक्षा पाटील | Updated: Nov 12, 2023, 05:27 PM IST
सोशल मीडियावर करत असलेल्या 'या' चुका आणू शकतात तुमच्या नात्यात दुरावा! title=
(Photo Credit : Freepik)

How social media is unhealthy for relationship : सोशल मीडियाच्या या युगात, हेल्थी नातेसंबंध राखणे आव्हानात्मक असू शकते आणि काही चुकांमुळे नातेसंबंधांवर, विशेषत: पती-पत्नीच्या नाजूक नात्यावर या सगळ्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज, आपण सोशल मीडियाशी संबंधित काही चुकांवर चर्चा जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात. या चुकांकडे लक्ष देऊन, तुम्ही सुधारण्याच्या दिशेने काम करू शकता. 

काय आहेत कारणं जाणून घ्या 

1. इतर नातेसंबंधांची तुलना
सोशल मीडियावर तुमच्या नात्याची इतरांशी तुलना करणे हानिकारक ठरू शकते. तुम्ही सोशल मीडियावर जे पाहता त्याचा वास्तवाशी दूरदूरपर्यंत संबंध नसतो. त्यासोबत या सगळ्यांना स्वतःच्या आयुष्याची तूलना न करता आणि त्याऐवजी आपल्या स्वतःच्या नातेसंबंधातीळ चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. 

2. खऱ्या आयुष्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करणे
खऱ्या आयुष्यातील समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे किंवा नातेसंबंधातील समस्यांवर चर्चा न करणे चुकीचे आहे.  सोशल मीडियाचा वापर सुटकेसाठी करण्याऐवजी थेट समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे.

3. वाद सोशल मीडियावर शेअर करणे 
तुमचे वैयक्तिक वाद सोशल मीडियावर स्टोरी ,स्टॅटस आणि पोस्टच्या माध्यमातून सार्वजनिक करणे तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकते. हे तुमच्या नातेसंबंधातील फक्त एक वाईट बाजू लोकांसमोर उघड करते. 

हेही वाचा : 40 शीत तरुणपणीपेक्षा जास्त सुंदर दिसू शकतात महिला, 'या' 6 गोष्टी करा फॉलो

4. ओव्हर-शेअरिंग
तुमच्या जोडीदाराच्या संमतीशिवाय तुमच्या नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याविषयीचे तपशील सोशल मीडियावर सतत शेअर केल्याने तुमच्या नातेसंबंधावर वेगळा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला सोशल मीडियावर सर्वकाही शेअर करण्यात आनंद वाटत असला तरी तुमच्या जोडीदाराला त्यावरून काही समस्या नाही ना हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ओव्हरशेअरिंग टाळणे आणि गोपनीयतेची पातळी राखणे आवश्यक आहे.

5. सोशल मीडियावर फ्लर्टिंग
ऑनलाइन फ्लर्टिंगमध्ये गुंतणे किंवा इतरांच्या पोस्टमध्ये रोमँटिक स्वारस्य दाखवणे आपल्या नातेसंबंधावर गंभीरपणे परिणाम करू शकते. यामुळे पार्टनरचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आणि तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या नातेसंबंधातील विश्वासाला धोका निर्माण करणारी कृती टाळा.

6. सीमा निश्चित करण्यात अयशस्वी
सोशल मीडियाच्या वापराबाबत स्पष्ट सीमा प्रस्थापित न केल्याने गैरसमज होऊ शकतात. याचाच अर्थ तुम्ही एकमेकांच्या डिजिटल स्पेसचा आदर करणं महत्त्वाचं आहे.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)