Andheri Bypoll Result 2022 : राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी लढत रंगत वाढलेली पाहायला मिळाली. 'नोटा'शी सामना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लटके यांनी पहिल्यापासून चांगली आघाडी घेतली ती 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेत चैतन्याचे वातावरण आहे. मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे
6 Nov 2022, 10:27 वाजता
Andheri Bypoll Result: चौथ्या फेरीत ऋतुजा लटके यांची आघाडी कायम । (Maharashtra Political News) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - चौथी फेरी
1- ऋतुजा लटके - 14648
2- बाळा नडार - 505
3- मनोज नाईक - 332
4- मीना खेडेकर - 437
5- फरहान सय्यद - 308
6- मिलिंद कांबळे - 246
7- राजेश त्रिपाठी - 492
नोटा - 3580
एकूण - 20548
6 Nov 2022, 10:25 वाजता
Andheri Bypoll Result: तिसऱ्या फेरी अंती ऋतुजा लटके यांना दुसऱ्या फेरीच्या तुलनेत केवळ 4 मते अधिक मिळाली आहेत. तर, नोटाला तिसऱ्या फेरीत दुसऱ्या फेरीपेक्षा 1497 मते अधिक मिळाली आहेत.
Maharashtra Political News : महाराष्ट्र विधानसभेच्या '166 - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे :
1- ऋतुजा लटके- 11361
2 - बाला नाडार - 432
3 - मनोज नाईक - 207
4- मीना खेडेकर- 281
5- फरहान सय्यद- 232
6- मिलिंद कांबळे- 202
7- राजेश त्रिपाठी- 410
आणि
नोटा -2967
एकूण मत : 16092
6 Nov 2022, 10:10 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी तिसऱ्या फेरीतही आघाडी घेतलेय. (Maharashtra Political News) तिसऱ्या फेरीत ऋतुजा लटके यांना 11361 मतं तर 'नोटा'ला 2967 मतं
6 Nov 2022, 09:53 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दुसऱ्या फेरीत पुन्हा घेतली आघाडी, दुसऱ्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना एकूण मते 12094 (Maharashtra Political News)
दुसऱ्या फेरीत उमेदवारांची मतं
- ऋतुजा लटके- 7817
- बाला नाडार - 339
- मनोज नाईक - 313
- मीना खेडेकवर- 185
- फरहान सय्यद- 185
- मिलिंद कांबळे- 136
- राजेश त्रिपाठी- 223
- नोटा -1470
Maharashtra | As per initial trends, Rutuja Latke, the candidate of the Uddhav Thackeray faction of Shiv Sena, leading with 4277 votes in the #AndheriEastByPoll
Visuals from the counting centre. pic.twitter.com/eJkabOBn9C
— ANI (@ANI) November 6, 2022
6 Nov 2022, 09:36 वाजता
Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Maharashtra Political News Update) मतमोजणी पहिला फेरीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली तर नोटाला दुसऱ्या पसंतीची मते, नोटाला 622 मतं तर सहा अपक्ष उमेदवारांना केवळ 725 मतं
6 Nov 2022, 09:22 वाजता
Andheri Bypoll Result: Maharashtra Political News - उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 4277 मतं तर 'नोटा'ला 622 मतं. अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांना 79 मतं
6 Nov 2022, 09:10 वाजता
Andheri Bypoll Result: EVM यंत्रातील मतांच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे.(Maharashtra Political News) मतमोजणीसाठी 14 टेबल आहेत. एकूण 19 फेऱ्या होणार, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट
6 Nov 2022, 08:51 वाजता
Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मजमोजणीच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेय. ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
6 Nov 2022, 08:45 वाजता
Andheri Bypoll Result: अंधेरीतील मतमोजणीची माहिती 'एलसीडी स्क्रीन'वर । प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन'वर दाखविण्यात येत आहे
Maharashtra Political News : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?
6 Nov 2022, 08:43 वाजता
Andheri Bypoll Result: 8.30 वाजता मोजणीला सुरुवात झाली आहे. EVMच्या मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होतील. मात्र, भाजपच्या मुरजी पटेल यांनी अगोदरच माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी झाली होती. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन ते चार तासांमध्येच निकाल स्पष्ट होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज