Andheri Bypoll Result 2022 : राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी लढत रंगत वाढलेली पाहायला मिळाली. 'नोटा'शी सामना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लटके यांनी पहिल्यापासून चांगली आघाडी घेतली ती 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेत चैतन्याचे वातावरण आहे. मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे
6 Nov 2022, 12:22 वाजता
Andheri Bypoll Result: ऋतुजा लटके (Rutuja Latke) या 11 व्या फेरीनंतरही आघाडीवर कायम असून त्यांना 42343 मतं मिळालीत.
अकराव्या फेरीअंती एकूण मतं
ऋतुजा लटके - 42343
बाळा नाडार - 1052
मनोज नाईक - 622
मीना खेडेकर - 948
फरहान सय्यद - 753
मिलिंद कांबळे - 455
राजेश त्रिपाठी - 1067
नोटा -8379
एकूण - 55619
6 Nov 2022, 12:13 वाजता
Andheri Bypoll Result: ऋतुजा लटके (Rutuja Latke) या 10 व्या फेरीनंतरही आघाडीवर कायम असून त्यांना 37469 इतकी मतं मिळालीत. तर नोटाला 7556 मतं. तर एकाही अपक्ष उमेदवाराला एक हजारापेक्षा जास्त मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांची निवडणूक अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे.
6 Nov 2022, 12:09 वाजता
Andheri Bypoll Result: अंधेरीत मतमोजणी केंद्राबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष. तर अधिकृत घोषणा झाल्यावर (Maharashtra Political News) सर्टिफिकेट घेतल्यावर ऋतुजा लटके या मातोश्रीवर जाणार
6 Nov 2022, 11:53 वाजता
Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) या मंदिरात गेल्या असून त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहेत. ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे, मात्र अधिकृत घोषणा बाकी
6 Nov 2022, 11:51 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 9 फेरीअखेर 32515 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'ला 6637 मतं मिळालीत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - नवव्या फेरीअंती एकूण
ऋतुजा लटके - 32515
बाळा नाडार - 897
मनोज नाईक - 543
मीना खेडेकर - 863
फरहान सय्यद - 667
मिलिंद कांबळे - 409
राजेश त्रिपाठी - 889
नोटा -6637
एकूण - 43420
6 Nov 2022, 11:30 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 8 फेरीअखेर 29033 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -आठव्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके -29033
बाळा नाडार -819
मनोज नाईक - 458
मीना खेडेकर - 789
फरहान सय्यद - 628
मिलिंद कांबळे - 358
राजेश त्रिपाठी - 787
नोटा - 5655
एकूण मतमोजणी - 38527
6 Nov 2022, 11:28 वाजता
Andheri Bypoll Result: सातव्या फेरीअखेर ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 24955 मते
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - सातव्या फेरीअंती एकूण मतमोजणी (Maharashtra Political News)
ऋतुजा लटके -24955
बाळा नाडार -733
मनोज नाईक - 416
मीना खेडेकर - 646
फरहान सय्यद - 545
मिलिंद कांबळे - 312
राजेश त्रिपाठी - 679
नोटा - 4712
एकूण मतमोजणी - 32998
6 Nov 2022, 10:54 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळालीत
6 Nov 2022, 10:50 वाजता
Andheri Bypoll Result: अंधेरी पोटनिवडणूक (Maharashtra Political News) मतमोजणीत ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांची 17278 मतांची आघाडी
पाचव्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली आहे. तर नोटालाही पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. नोटाला 3859 मिळालीत.
पाचव्या फेरीअंती एकूण मतं
1- ऋतुजा लटके - 17278
2- बाळा नडार - 570
3- मनोज नाईक - 365
4- मीना खेडेकर - 516
5- फरहान सय्यद - 378
6- मिलिंद कांबळे - 267
7- राजेश त्रिपाठी - 538
नोटा - 3859
एकूण - 23771
6 Nov 2022, 10:39 वाजता
Andheri Bypoll Result: अंधेरी पोटनिवडणूक (Maharashtra Political News) मतमोजणीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांनी आघाडी घेतली असली तरी नोटालाही मतदारांची पसंती मिळत असल्याने लटके विरुद्ध 'नोटा' याचीच चर्चा अधिक