Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

Gram panchayat Election Result 2022 LIVE : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी थोड्याच वेळात मतमोजणी. दिग्गजांची प्रतिष्ठापणाला. निकालाचे जलद आणि अचूक निकाल झी 24 तासवर

Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

 

20 Dec 2022, 09:27 वाजता

कोल्हापुरात भाजप - शिंदे गटाची बाजी, मुश्रीफ यांना दे धक्का

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत जाहीर झालेला निकाल. येथे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
भाजप – 5
ठाकरे गट – 2
शिंदे गट – 4
राष्ट्रवादी - 1
काँग्रेस - 1 
एकूण – 430/ 13

20 Dec 2022, 09:17 वाजता

पन्हाळा तालुक्यात स्थानिक आघाडी 

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर पन्हाळा तालुक्यात स्थानिक आघाडी. गोटे गावात दीपाली विजय पाटील सरपंचपदी विजयी तर मोरेवाडी गावात रणजीत तांदळे  सरपंचपदी विजयी 

तर दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात. संभाजीपूरमधूनही सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे उमेदवार विजयी

20 Dec 2022, 09:09 वाजता

शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड 

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंतर आता  शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड ( आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ) अकिवाटमधून सरपंचपदाच्या सौ. वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी. खिद्रापूरमधून सरपंच पदाचे उमेदवार सौ. सारिका कुलदीप कदम विजयी. तर टाकवडेमधून सरपंच पदाचे उमेदवार सौ. सविता मनोज चौगुले विजयी. 

20 Dec 2022, 09:01 वाजता

कोल्हापुरात ठाकरे गटाने खातं खोललं

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खातं खोललं. व्हनाळी येथे संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी

20 Dec 2022, 08:52 वाजता

कागल आणि करवीरमध्ये भाजपची सत्ता

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपची बाजी. कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये  हसन मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का. सरपंचपदी राजे- मंडलिक गटाची बाजी

20 Dec 2022, 08:39 वाजता

पुणे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : 
1) वेल्हे : 28 पैकी 3 बिनविरोध - 25 ठिकाणी मतमोजणी
2) भोर : 54 पैकी 24 बिनविरोध - 30 ठिकाणी मतमोजणी
3) जुन्नर : 17 पैकी 4 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी
4) आंबेगाव : 21 पैकी 5 बिनविरोध - 16 ठिकाणी मतमोजणी
5) खेड : 23 पैकी 2 बिनविरोध - 21 ठिकाणी मतमोजणी
6) मावळ : 9 पैकी 1 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी
7) शिरूर : 4 पैकी 0 बिनविरोध - 4 ठिकाणी मतमोजणी
8) मुळशी : 11 पैकी 6 ठिकाणी बिनविरोध - 5 ठिकाणी मतमोजणी 
9) हवेली : 7 पैकी 0 बिनविरोध - 7 ठिकाणी मतमोजणी
10) दौंड : 8 पैकी 0 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी
11) बारामती : 13 पैकी 0 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी
12) इंदापूर : 26 पैकी 0 बिनविरोध - 26 ठिकाणी मतमोजणी

20 Dec 2022, 08:38 वाजता

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल
Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापुरातील बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तिन्ही गावात भाजपचा झेंडा तर कागल तालुक्यात भाजपची घोडदौड सुरु.

20 Dec 2022, 08:33 वाजता

सांगली जिल्ह्यात 31 ग्रामपंचायती बिनविरोध 

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : सांगली जिल्ह्यात 447 ग्रामपंचायत निवडणुकीत 31 ग्रामपंचायत हे बिनविरोध झाले आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदे गट -  9   (जत 3,खानापूर आटपाडी 5, वाळवा 1, भाजप -  7, राष्ट्रवादी - वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात 10, शिवसेना ठाकरे गट -  एकही नाही, काँग्रेस पक्ष - 2,

20 Dec 2022, 08:30 वाजता

 कोल्हापुरातून पहिला निकाल हाती

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापुरातून पहिला निकाल हाती. कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल उधळला गेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर पाहायला मिळाले आहे. आमदार हसन मुश्रीफ गटाला मोठा धक्का बसला आहे. सरपंचासह राजे गटाची बाजी

20 Dec 2022, 08:25 वाजता

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापूर एकूण 43 बिनविरोध ग्रामपंचायत 

स्थानिक विकास आघाडी  : 14
जनसुराज्य शक्ती: 10
काँग्रेस: 3
राष्ट्रवादी काँग्रेस: 7
शिवसेना ठाकरे गट: 3
शिवसेना शिंदे गट: 6