Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

Gram panchayat Election Result 2022 LIVE : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी थोड्याच वेळात मतमोजणी. दिग्गजांची प्रतिष्ठापणाला. निकालाचे जलद आणि अचूक निकाल झी 24 तासवर

Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

 

20 Dec 2022, 10:25 वाजता

नागपूर जिल्ह्यात पहिला निकाल हाती

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  नागपूर जिल्ह्यात गुमथळा ग्रामपंचायत पहिला निकाल हाती । ग्रामविकास एकता पॅनल विजयी । 8 पैकी 6 जागा (भाजप - काँग्रेस समर्थन होते)

20 Dec 2022, 10:24 वाजता

औरंगाबाद जिल्ह्यातील पहिला निकाल भाजपला, पुण्यात ठाकरे गट

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  औरंगाबाद जिल्ह्यात बनगाव ग्रामपंचायत फुलंब्रीमध्ये भाजप विजयी,  उशाबाई मुरमे सरपंचपदी विजयी,  तर पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात पहिला निकाल ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाजुने. आव्हाळवाडीतील वार्ड क्रमांक 1 मधून सेनेचे प्रशांत रघुनाथ सातव, सोनाली दाभाडे विजयी

20 Dec 2022, 10:06 वाजता

राधानगरी तालुक्यातदेखील शिंदे गटाने खाते खोललं 

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल. राधानगरी तालुक्यातदेखील शिंदे गटाने खाते खोललं । हसणे गावामध्ये शिंदे गटाची सत्ता । आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीचा झेंडा । सरपंच उमेदवार सुनीता कांबळे विजयी । तर पन्हाळा तालुक्यात तांदुळवाडी ग्रामपंचायत सरपंच  पदाच्या निवडणूकित ठाकरे गटाच्या सुनीता सरदार पाटील सरपंचपदी विजयी । वेतवडे ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीची सत्ता. सरपंच पदी रेखा पोवार विजयी । आजरा तालुक्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजूने. चितळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा. सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले विजयी

20 Dec 2022, 09:50 वाजता

पालकमंत्री शंभुराज देसाईंना मोठा धक्का, सरपंच राष्ट्रवादीचा

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात पालकमंत्री शंभुराज देसाईंना धक्का, सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा झाल्याने राष्ट्रवादीत मोठा जल्लोष करण्यात येत आहे.

कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांना 4 जागांवर विजय. विरोधी राष्ट्रवादीला 2 जागा. सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं 2 मतानं मिळवला विजय.

20 Dec 2022, 09:46 वाजता

रत्नागिरी जिल्ह्यात पहिला ठाकरे गटाचा सरपंच विजयी

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर । गुहागर  आबलोली पहिला निकाल जाहीर । ठाकरे गटाने खाते खोलले । आबलोली इथं ठाकरे गटाचा सरपंच विजयी । वैष्णवी नेटके विजयी, आमदार भास्कर जाधव यांचा मतदार संघ

20 Dec 2022, 09:43 वाजता

 शिवसेना शिंदे गटाचा झेंडा

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : रायगड जिल्ह्यात पाहिले 8 निकाल जाहीर । महाड तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची आघाडी. 8 पैकी 6 ग्राम पंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा. 2 ग्राम पंचायती महाविकास आघाडीकडे

20 Dec 2022, 09:42 वाजता

पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : सातारा जिल्ह्यात कराड अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय

20 Dec 2022, 09:40 वाजता

आजरात पहिला निकाल भाजपच्या बाजूने

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल. आजरा तालुक्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजूने. चितळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा. सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले विजयी

20 Dec 2022, 09:38 वाजता

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :   कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खोलले खाते. हेरवाड  ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता.  रेखा अर्जुन जाधव सरपंचपदी विजयी

20 Dec 2022, 09:27 वाजता

कोल्हापुरात भाजप - शिंदे गटाची बाजी, मुश्रीफ यांना दे धक्का

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत जाहीर झालेला निकाल. येथे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
भाजप – 5
ठाकरे गट – 2
शिंदे गट – 4
राष्ट्रवादी - 1
काँग्रेस - 1 
एकूण – 430/ 13