Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

Gram panchayat Election Result 2022 LIVE : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी थोड्याच वेळात मतमोजणी. दिग्गजांची प्रतिष्ठापणाला. निकालाचे जलद आणि अचूक निकाल झी 24 तासवर

Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

 

20 Dec 2022, 10:46 वाजता

पालोती ग्रामपंचायतवर अपक्षांची बाजी

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  वर्धा तालुक्याच्या पालोती ग्रामपंचायतवर अपक्षाचा कब्जा । सरपंचपदी आनंद खंडागळे विजयी । सरपंचासह सहा सदस्य अपक्ष विजयी । युवा ग्राम विकास आघाडीचा विजय

20 Dec 2022, 10:44 वाजता

रत्नागिरी मतदार संघातून ठाकरे गटाला दुसरा धक्का

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय । श्रावणी रांगणकर शिंदे गटाच्या सरपंच विजयी । रत्नागिरी मतदार संघातून ठाकरे गटाला दुसरा धक्का । उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व कायम

20 Dec 2022, 10:44 वाजता

सोलापुरातील करमाळ्यात शिंदे गटाची बाजी

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : तालुका करमाळा ग्रामपंचायत सरपंच  निकाल 
मोरवड - शिंदे गट
पोंधवडी - शिंदे गट
विहाळ  - शिंदे गट
वरकटणे -शिंदे गट 
पोमलवाडी - राष्ट्रवादी काँग्रेस

20 Dec 2022, 10:42 वाजता

अकोल्यानंतर पालघर जिल्ह्यात मनसेने खात उघडलं 

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  पालघर जिल्ह्यात मनसेने खात उघडलं. पालघरमधील गुंदले ग्रामपंचायतीवर मनसेच इंजिन. गुंदले ग्रामपंचायतवर सरपंचपदी मनसेचे जयेश आहडी विजयी.

20 Dec 2022, 10:39 वाजता

रत्नागिरीत ठाकरे गटाचा दबदबा, शिंदे गटाला पहिला विजय

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने उघडले खाते । रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय । सरपंच सौरवी पाचकुडे शिंदे गटाच्या सरपंच विजयी । उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मतदार संघ

एकुण ग्रामपंचायत- 222
बिनविरोध - 66
शिवसेना - 37
शिंदे गट - 09
भाजप- 05
राष्ट्रवादी- 02
काँग्रेस- 00
इतर-13
एक ग्रामपंचायतीसाठी कोणीही अर्ज केला नाही 

20 Dec 2022, 10:35 वाजता

औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाने खाते खोलले

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाने खाते खोलले । सिल्लोड तालुक्यात दोन ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात । सारोळा आणि कासोड ग्रामपंचायत शिंदे गट विजयी

20 Dec 2022, 10:35 वाजता

धाराशिव ग्रामपंचायत निकाल

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : धाराशिव ग्रामपंचायत निकाल - 166 जागा

शिवसेना - 05
शिंदे गट - 01
भाजप - 11
राष्ट्रवादी - 01
काँग्रेस - 02
इतर - 09 

ग्रामपंचायत – क्षेत्र माऊली (कोरेगाव)
सरपंच-भाजप शिंदे गट
एकूण सदस्य - 13
10 जागा भाजप-शिंदे गट 
3 जागा राष्ट्रवादी

20 Dec 2022, 10:34 वाजता

 मोठी बातमी । सत्ताधारी सरपंच यांचा 1 मताने पराभूत

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापूर दक्षिणमधील पहिला निकाल । दिंडणेर्ली गावात स्थानिक आघाडीची सत्ता । आजरा तालुका - वडकशिवाले ग्रामपंचायत निवडणूक । विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे यांचा एक मताने पराभव । राष्ट्रवादीचे जयवत शिंदे  1 मताने विजयी । शिंदे यांना 168 मते तर भाजप विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे याना 167 मते । सत्ताधारी सरपंच यांचा 1 मताने पराभव

20 Dec 2022, 10:28 वाजता

अकोल्यात मनसेने खाते खोलले

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  अकोला ग्रामपंचायत सरपंच पदाचे निकाल खालील प्रमाणे

एकुण ग्रामपंचायत 265

07 अविरोध निवडून आलेले आहे..

वंचित बहुजन आघाडी : 03
शिवसेना उद्धव : 03
शिवसेना शिंदे गट : ..
भाजप : 01
राष्ट्रवादी : ..
काँग्रेस : 01
मनसे : 01
इतर : 02

20 Dec 2022, 10:27 वाजता

उरण तालुक्यातील निकाल हाती

Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  रायगड जिल्ह्यात  उरण तालुक्यातील एकूण ग्रामपंचायत - 17 । उरण येथे तीन ग्रामपंचायतवर भाजप विजयी । डोंगरी , सारडे, रानसई येथे भाजप । नविनशेवा येथे ठाकरे गट सेना सरपंच , सदस्य विजयी । पुनाडे येथे काँग्रेस - सेना सरपंच विजयी