Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
20 Dec 2022, 12:59 वाजता
खरोशी ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले । सरपंचासह सहा सदस्य विजयी । दशरथ गावंड सरपंच पदी विराजमान
20 Dec 2022, 12:57 वाजता
बबनराव लोणीकर यांच्या पुतण्याचा दणदणीत विजय
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जालना जिल्ह्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. बबनराव लोणीकर यांच्या पुतण्याचा लोणी ग्रामपंचायतीत दणदणीत विजय, राष्ट्वादीच्या माजी खासदाराचा नातू पराभूत झाला. राज्याचे माजी मंत्री आणि जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांचं जन्म गाव असलेल्या लोणी गावात बबनराव लोणीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.अखेर या ग्रामपंचायतीवर लोणीकर यांनी आपली सत्ता अबाधीत ठेवलीय. लोणीकर यांचा पुतण्या गजानन लोणीकर यांनी राष्ट्रवादीचे परभणीचे माजी खासदार रामराव लोणीकर यांचा नातू संग्राम यादव यांचा पराभव केलाय.त्यामुळे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लोणी ग्रामपंचायतीवर लोणीकर यांनी आपली सत्ता अबाधित ठेवत भाजपचा पुन्हा एकदा झेंडा रोवलाय.
20 Dec 2022, 12:54 वाजता
पुणे जिल्ह्यात कोणाला किती जागा?
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : पुणे जिल्ह्यात कोणाला किती जागा मिळाल्यात. (यात बिनविरोध सरपंच )
राष्ट्रवादी काँग्रेस - 68
भाजप - 19
काँग्रेस - 15
शिवसेना (शिंदे गट) - 1
शिवसेना (ठाकरे गट) - 8
स्थानिक आघाडी - 41
एकूण 221 - 152
20 Dec 2022, 12:43 वाजता
पालकमंत्री दादा भुसे यांना भाजपचा दे धक्का
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : नाशिक मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांना स्वतःच्या मतदार संघातच पहिल्या फेरीत मोठा धक्का तीन ग्रामपंचायतीनमध्ये भाजपचे वर्चस्व । करंजगव्हाण सह तीन गावांवर भाजपचे वर्चस्व। शिंदे गटाला 2 जागा
20 Dec 2022, 12:42 वाजता
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगाव जिल्ह्यात एकूण 122 ग्रामपंचायत निवडणूक
सरपंच
भाजप :- 23
शिंदे गट :- 6
राष्ट्रवादी :- 19
काँग्रेस :- 2
इतर :- 5
20 Dec 2022, 12:40 वाजता
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : अहमदनगर
शेवगाव:-12 ग्रामपंचायत
1)जोहरापुर - राष्ट्रवादी
2)भयगांव- राष्ट्रवादी
3)खामगांव- राष्ट्रवादी
4)दहीगांव ने :- राष्ट्रवादी
5)रांजणी- राष्ट्रवादी
6)प्राभुवाडगाव- राष्ट्रवादी
7)वाघोली- भाजप
8)अमरापूर- भाजप
9)सुलतानपुर खुर्द - भाजप
10)अखेगाव ति- अपक्ष- जनशक्ती
11)खानापूर- राष्ट्रवादी
12)कुरुडगाव(रावतळे)- भाजप
पाथर्डी:- 11 ग्रामपंचायत
1)मोहरी- भाजप
2)वडगाव- अपक्ष
3)सोनोशी- भाजप
4)कोळसांगवी- भाजप
5)निवडुंगे- भाजप
6)भालगाव- भाजप
7)वैजूबाभूळगाव- राष्ट्रवादी
8)कोरडगाव- वंचित बहुजन
9)कोल्हार- ठाकरे गड
10)तिसगाव- भाजप
11)जिरेवाडी- अपक्ष- जण शक्ती
जामखेड:-3
1)शिऊर- भाजप
2)राजुरी- राष्ट्रवादी
3)रत्नापुर- राष्ट्रवादी
कर्जत:-8
1)कापरेवाडी- भाजप
2) माळंगी- भाजप
3)बहिरोबावाडी- भाजप
4)मुळेवाडी- भाजप
5)कोपर्डी- राष्ट्रवादी
6)कौडाणे- भाजप
7)निंबे- राष्ट्रवादी
8)आळसुंदे- भाजप
श्रीगोंदा:-10
1)घोगरगाव- राष्ट्रवादी
2)माठ- भाजप
3)तरडगव्हाण- भाजप
4)कष्टी-
5)बनपिंप्री- राष्ट्रवादी
6)पारगाव- राष्ट्रवादी
7)चवर सांगावी- काँग्रेस
8)थिटे सांगावी- काँग्रेस
9)बेलवंडी- राष्ट्रवादी
10)तांदळी दुमाला- राष्ट्रवादी
पारनेर:-16
1)भोंद्रे-
2)पिंपळगांव तुर्क-
3)पळशी-
4)वनकुटे- राष्ट्रवादी
5)करंदी-
6)हत्तलखिंडी-
7)पुणेवाडी-
8)सिध्देश्वरवाडी-
9)भाळवणी- शिंदे गट
10)ढवळपूरी - राष्ट्रवादी
11)पाडळीतर्फे कान्हूर
12)गोरेगांव- ठाकरे गट
13)चोेंभूत-
14)गुणोरे--
15)म्हस्केवाडी-
16)कोहकडी-
नगर तालुका:- 27
1)आठवड-
2)खातगाव --
३)टाकळी - -
4)पिंपळगाव लांडगा - भाजप
5)राळेगण(म्हसोबा)
6)रांजणी - भाजप
7),बाबुर्डीबेंद-
8)पिंपळगाव कौडा -
9)दहीगाव -
10)कापूरवाडी -
11)सारोळा कासार -
12) शेंडी -
13)सोनेवाडी पि.ला.
14)आगडगाव - भाजप
15 )सोनेवाडी (चास),-
16 ) वडगाव तांदळी - भाजप
17 )मदडगाव -
18 )पांगरमल-
19 )उक्कडगाव-
20 )वाळकी-
21 )जखणगाव -
22 )कौडगाव / जांब
23 )नारायणडोहो- भाजप
24 ) .नादगाव -
25 )नेप्ती -
26 )साकत खुर्द -
27 )सारोळाबद्दी - भाजप
20 Dec 2022, 12:33 वाजता
विखे आणि थोरात गटाला शह, इंदुरीकर महाराजांच्या सासू सरपंच
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासू सरपंचपदी । संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवला विजय ।अपक्ष उमेदवारी करत निवडणूक रिंगणात । शशिकला शिवाजी पवार यांचा सरपंच पदावर विजय । विखे आणि थोरात गटाला शह देत इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई सरपंचपदी
20 Dec 2022, 12:30 वाजता
महविकास आघाडीचा झेंडा, शिंदे गटाचा धुव्वा
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : रायगड जिल्ह्यात गोरेगाव ग्रामपंचायतीवर महविकास आघाडीचा झेंडा । शिंदे गटाचा उडवला धुव्वा गोरेगावही रायगडमधील महत्वाची ग्रामपंचायत । झुबेर अब्बासी पुन्हा सरपंचपदी विराजमान । सदस्य पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 13 जागा शिंदे गटाला केवळ 2 जागा
20 Dec 2022, 12:24 वाजता
आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं : पंकजा मुंडे
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं : भाजप नेत्या पंकजा मुंडे
नाथरा ग्रामपंचायत तिचा निकाल हाती आलेला आहे. यामध्ये अभय मुंडे यांचा विजय झालेला आहे तर या अगोदरच आम्ही ठरवूनच अभय मुंडे यांना बिनविरोध देण्याचा ठरवलं होतं. त्यांचा सरपंच आमचा उपसरपंच असेल असं पहिल्यांदाच ठरलं होतं मात्र तिथे निवडणूक लागली आणि पुन्हा अभय मुंडे निवडून आले हे आमचे पहिल्यांदाच ठरल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
20 Dec 2022, 12:21 वाजता
मालेगाव ग्रामपंचायत कोणी मारली बाजी?
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : मालेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी बाजी मारली?
निंबायती - माळी ताईबाई बापू
चौकटपाडे - निर्मला पवार (अपक्ष )
रोंझे -सुमन गायकवाड ( बिनलविरोध )
शिरसोडी -सोनाली पवार ( भाजप )
मोहपाडे - सदाशिव बोरकर ( अपक्ष )
सौदाणे - शितल पवार ( शिंदे गट )
जाटपाडे - भागचंद तेजा ( पक्ष )
वजीरखेड - सुनीता बोरसे ( शिंदे गट )
माल्हणगाव - बाबाजी सूर्यवंशी ( भाजप )
करंजगव्हाण - कविता सोनवणे ( भाजप )