IND vs NZ 2nd T20 Live: टीम इंडियाचा न्य़ुझीलंडवर दणदणीत विजय

India vs New Zealand 2nd T20 Live Cricket Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे.

IND vs NZ 2nd T20 Live: टीम इंडियाचा न्य़ुझीलंडवर दणदणीत विजय

IND vs NZ Live Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे. पहिला सामना पावसाने खराब केला होता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र आता  न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ : इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.

20 Nov 2022, 13:54 वाजता

IND vs NZ Live update : भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे. भारत 147-3

20 Nov 2022, 13:39 वाजता

IND vs NZ Live update : श्रेयस अय्यर 13 धावा करून हिट-विकेट बाद झाला. ऑनसाइडला फटका मारताना त्याचा उजवा पाय यष्टीला लागला. भारत 108-3

20 Nov 2022, 13:33 वाजता

IND vs NZ Live update : भारताच्या दोन बाद 97 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरने सोढीच्या ओव्हरमध्ये 15 धावा, भारत 97-2

20 Nov 2022, 13:25 वाजता

IND vs NZ Live update : भारताचे पहिले दहा षटके पूर्ण झाले असून टीम इंडियाच्या पहिल्या १० षटकात सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. आता सध्या श्रेयस अय्यर- सूर्यकुमार यादव खेळत आहेत. भारत 72-2

20 Nov 2022, 13:24 वाजता

IND vs NZ Live update : भारताला दुसरा धक्का, ईशान किशन बाद 

20 Nov 2022, 13:19 वाजता

IND vs NZ Live update : माउंट मांउगानुईमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून सामना पुन्हा सुरु झाला आहे. 51-1

20 Nov 2022, 12:46 वाजता

IND vs NZ Live update : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा पुन्हा सुरूवात, सामना थांबविण्यात आला आहे. भारत 50-1  

20 Nov 2022, 12:37 वाजता

IND vs NZ Live update : ईशान किशन आणि ऋषभ पंत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. पण पॉवर प्ले मध्ये किशनने शानदार फटकेबाजी केली. भारत 50-1

20 Nov 2022, 12:35 वाजता

IND vs NZ Live update : टी 20 सामन्यात सलामीवीर ईशान किशन आणि ऋषभ पंत यांनी चांगली सुरुवात केली होती मात्र सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. पंतने 13 चेंडूत 6 धावा केल्या. त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. भारत 36-1

20 Nov 2022, 12:33 वाजता

IND vs NZ Live update : भारताला पहिला धक्का, ऋषभ पंत बाद