Maharashtra Pune Bandh LIVE Updates : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी 7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
13 Dec 2022, 09:57 वाजता
Pune Bandh LIVE Updates : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात पुणे बंदची हाक, सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन. मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर पुण्यातील रिक्षाचालकांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. पुण्यातील बाईक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालक आक्रमक झालेत.
- महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात पुणे बंद
- मविआ, सामाजिक संघटनांकडून मोर्चाला सुरुवात
- सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन
- मोर्चात खासदार उदयनराजे सहभागी होण्याची शक्यता
- मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
- मोर्चासाठी पुण्यातील बाजारात शुकशुकाट
13 Dec 2022, 09:16 वाजता
बंदला छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा
Pune Bandh LIVE Updates : पुणे बंदला छत्रपती संभाजीराजे यांचा पाठिंबा आहे. छत्रपती संभाजीराजे पुणे बंद मध्ये सहभागी होणार होते. परंतु दिल्लीमध्ये महत्वाची बैठक असल्याने त्यांना पुण्यात येता आले नाही. आपला पुणे बंदला पाठिंबा असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी कळविले आहे.
13 Dec 2022, 09:15 वाजता
Pune Bandh LIVE Updates : पुण्यामध्ये अत्यावश्यक घटक वगळता सर्व काही बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष करुन सकाळी सकाळी गर्दी होणारी ठिकाण म्हणजे खाण्याचे स्टॉल, चहा कॉफीचे स्टॉल या ठिकाणी शुकशुकाट आहे. हे स्टॉल बंद असल्याने हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांची मात्र काहीशी अडचण होताना दिसत आहे.
13 Dec 2022, 09:05 वाजता
पुण्यात मूक मोर्चा
Pune Bandh LIVE Updates : राज्यपाल हटाव मागणीसाठी आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून मूक मोर्चा काढण्यात येत आहे. सुरक्षेसाठी साडेसात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अपमानास्पद घोषणांवर बंदी करण्यात आली आहे.
13 Dec 2022, 09:03 वाजता
राज्य राखीव पोलिसांच्या तुकडी घटनास्थळी दाखल
Pune Bandh LIVE Updates : पुण्यातील रिक्षाचालकांनी काल केलेला चक्काजाम अखेर पुणे पोलिसांनी मोडून काढला. आरटीओ कार्यालयासमोर शेकडो रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांसह ठिय्या मांडला होता. त्यामुळे संपूर्ण वाहतूक खोळंबा झाला. अखेर राज्य राखीव पोलिसांच्या तुकडी घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व रिक्षाचालकांना रस्ता मोकळा करण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र रिक्षा चालकांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनीच रस्त्यावरून रिक्षा हटवल्या आणि रिक्षाचालकांनाही हटकलं.
13 Dec 2022, 08:24 वाजता
केशव क्षीरसागर यांना पोलिसांनी केली अटक
Pune Bandh : रिक्षा संघटना आंदोलन प्रकरणी संघटना अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना पोलिसांनी केली अटक । शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गार्डन पोलिसांनी केला क्षीरसागर यांच्यासह सहा लोकांवर गुन्हा दाखल
रिक्षा चालकांचा आंदोलन चिघळणार
बाईक, टॅक्सी बंद करावी या मागणीसाठी रिक्षा संघटनांनी केला होता काल आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम (हेही बातमी वाचा - Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात)
13 Dec 2022, 08:14 वाजता
शाळा बंदबाबत संभ्रम, सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम!
Pune Bandh LIVE : शहरातील शाळा महाविद्यालयमध्ये बंद बाबत कुठल्याच स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. असं असलं तरी रिक्षा वाहतूक तसेच सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे शाळामध्ये फारशी उपस्थिती असण्याची शक्यता नाही. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सुमारे साडेसात हजार पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांमधला संभ्रम कायम ।अनेक शाळा सुरु, मात्र आपल्या पाल्यांना पालकांना शाळेमध्ये सोडवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. स्कूल व्हॅन बंद आहेत तर काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #School #PuneSchool pic.twitter.com/yJEi9XUlXs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022
13 Dec 2022, 08:13 वाजता
संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय
Pune Bandh LIVE : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत तसेच महापुरुषाबाबत वारंवार अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे शहर बंद बाबत पुकारण्यात आला आहे. त्याविरोधात संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संबधित संघटनांनी घेतला आहे. मार्केट यार्ड आज रात्रीपासूनच बंद आहे.
पुणे बंदमध्ये संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय । छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत तसेच महापुरुषाबाबत वारंवार अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणेशहर बंद बाबत पुकारण्यात आला आहे. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #MaharashtraBandh #Bandh pic.twitter.com/q3QSY164bp
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022
13 Dec 2022, 08:11 वाजता
पुण्यात या रस्त्यावरील वाहतूक बंद
Pune Bandh LIVE : पुण्यामध्ये आज छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते लाल महाल समोरच्या काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
- लक्ष्मी रस्ता : सोन्या मारुती चौक ते टिळक चौक
- शिवाजी रस्ता : स गो बर्वे चौक ते बेलबाग चौक
- बाजीराव रस्ता : पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक
- गणेश रस्ता : फडके हौद चौक ते जिजामाता चौक
- केळकर रस्ता : आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक
13 Dec 2022, 08:10 वाजता
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याती मागणी
Pune Bandh LIVE : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यात यावं ही यातील प्रमुख मागणी आहे. बंदच्या निमित्ताने शहरात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. लाल महालाजवळ जाहीर सभेने मोर्चाचा समारोप होणार आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. #PuneBandh #Maharashtra #BhagatSinghKoshyari #MaharashtraBandh #Bandh pic.twitter.com/yoNaOGbYy4
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 13, 2022