30 Nov 2022, 23:39 वाजता
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली
Transfer of IAS Officer Tukaram Mundhe : आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा बदली झालीय. तुकाराम मुंढे यांची 16 वर्षाच्या सेवेत तब्बल 19 वेळा बदली झालीय. आता तुकाराम मुंढे यांची शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. आरोग्या खात्यातील आयुक्तपदावरून केवळ दोन महिन्यांत मुंढेंची बदली करण्यात आली.. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी मुंढेंची पोस्टिंग झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले. तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल नेहमी समाधान असतं.
बातमीची लिंक- https://bit.ly/3UtfFr2
30 Nov 2022, 19:06 वाजता
नवाब मलिकांना जामीन नाहीच
Nawab Malik | Maharashtra Political News : नवाब मलिकांचा (Nawab Malik) जामीन अर्ज पुन्हा फेटाळला. विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टानं फेटाळला जामीन अर्ज, 23 फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक जेलमध्ये, पैशांची अफरातफर, जबरदस्तीनं जमीन बळकावणे, मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंगप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हे.
बातमीची लिंक - https://bit.ly/3XX1Gg7
30 Nov 2022, 18:20 वाजता
उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद
Udayanraje Bhosale | Maharashtra Political News : शिवरायांनी लोकशाहीचा आदर्श ठेवला- उदयनराजे, शिवरायांनी जातिभेद केला नाही- उदयनराजे. देशातील चळवळी शिवरायांमुळे उभ्या राहिल्या, 'आज राज्यपाल बोलले, उद्या कुणीही बोलेल', महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा करा, उदयनराजे यांची मागणी, प्रत्येक पक्ष भूमिका स्पष्ट करणार की नाही? खासदार उदयनराजेंचा संतप्त सवाल.
बातमीची लिंक - https://bit.ly/3FbkbWD
30 Nov 2022, 17:55 वाजता
उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद
Udayanraje Bhosale | Maharashtra Political News : शिवरायांनी जगाला लोकशाहीचा धडा घालून दिला, शिवरायांनी ठरवलं असतं तर अजूनही राजेशाही असती- उदयनराजे
शिवरायांमुळेच भारतात लोकशाही रुजली, स्वराज्याची स्थापना म्हणजे आजची लोकशाही- उदयनराजे भोसले.
बातमीची लिंक - https://bit.ly/3FbkbWD
30 Nov 2022, 14:52 वाजता
'समृद्धी'च्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला
Samruddhi Mahamarg Inauguration : बहुप्रतीक्षित समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करणयात येईल अशी माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीये. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या बर्डी ते ऑटोमोडिव चौक तसंच बर्डी ते पारडी अशा मार्गांचं उद्घाटन (Nagapur Metro Inauguration) केलं जाणार आहे.. त्यासाठी पंतप्रधानांचा दौरा जवळपास निश्चित झाला असून या दौ-यासाठी नागपुरातील प्रशासन तयारीला लागल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
बातमी पाहा - नागपूरकरांची प्रतीक्षा संपली, नागपूर-मुंबई प्रवास होणार सोप्पा
30 Nov 2022, 14:40 वाजता
महाराष्ट्र केसरीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
Maharashtra Kesari Controversy : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेबाबतचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजयकुमार सिंग (Sanjay Kumar Singh) यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलीय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार याबाबतही संभ्रम निर्माण झालाय. महाराष्ट्र केसरीची एक स्पर्धा होणार की दोन याबाबत पण अजून संभ्रम आहे. लवकरच शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजयकुमार सिंग यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती काका पवार (Kaka Pawar) यांनी दिलीय.
बातमी पाहा - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद काही सुटेना? पाहा व्हिडिओ
30 Nov 2022, 13:58 वाजता
भाजप नेत्याकडून शिंदेंच्या बंडाची आग्रा सुटकेशी तुलना, विरोधकांकडून चौफेर टीका
Maharashtra Political News LIVE : मंत्री मंगलप्रभात लोढांनी (Mangalprabhat Lodha) केलेल्या वक्तव्यानं नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची आग्रा सुटकेशी तुलना केलीय. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) जसे आग्रातून सुटका करुन बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडले. असं वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलंय. शिवाजी महाराजांना आग्रामध्ये कैद केलं होतं. आग्राहून बाहेर पडल्यानंतर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं शक्य झालं असंही ते म्हणाले. शिवाजी महाराजांसोबत तुलना कशी करता असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. तर महाराष्ट्राच्या खच्चीकरणाचा भाजपचा हा प्लॅन असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केलाय.
बातमी पाहा - भाजपच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना आग्रा सुटकेशी; विरोधकांकडून चौफेर टीका
30 Nov 2022, 12:42 वाजता
पहिल्या टप्प्यात 4 शहरांत ई-रुपी चलनात
E-RUPEE In Market : देशात उद्यापासून किरकोळ बाजारात 'ई-रुपी' वापरता येणार आहे.. आरबीआयनं (RBI) याबाबत घोषणा केलीये.. पहिल्या टप्प्यात देशातील मुंबई (Mumbai), नवी दिल्ली (New Delhi), बंगळुरु (Bengluru) आणि भुवनेश्वर (Bhuwaneshwar) या शहरांत ई-रुपीचा (E-RUPEE) वापर करता येणार आहे.. सरकारी क्षेत्रातील स्टेट बँक (SBI) आणि खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक(ICICI Bank) , येस बँक (YES Bank) आणि आयडीएफसी (IDFC Bank)बँकेमार्फत ‘डिजिटल रुपी’च्या किरकोळ वापराला सुरुवात होईल.
बातमी पाहा - देशात उद्यापासून वापरात येणार ई-रुपी चलन, कसे असेल हे डिजीटल चलन पाहा?
30 Nov 2022, 12:04 वाजता
उदयनराजे भोसलेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद
Satara Udayanraje Bhosale : किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्याला उदयनराजे भोसले गैरहजर राहिलेत. राज्यपालांनी (Governor Of Maharashtra) छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यानं उदयनराजे नाराज होते. राज्यपालांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. पण कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळेच उदयनराजेंनी किल्ले प्रतापगडावरच्या (Pratapgad Killa) कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. उदयनराजे भोसले दुपारी चार वाजता पत्रकार परिषद (Udayanraje Bosale Press Confernece) घेणार आहेत...
30 Nov 2022, 11:42 वाजता
नागपुरात रॅगिंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
Nagpur Ragging : नागपूरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) रॅगिंग केल्याप्रकरणी इंटर्नशिप करणा-या 6 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलीय..एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचं (MBBS First Year Student) रॅगिंग केलं होतं..सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली..
बातमी पाहा - सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे रॅगिंग