30 Nov 2022, 11:35 वाजता
किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा
Shivpratap Din : किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते किल्ले प्रतापगडाच्या (Pratapgad Killa) मुख्य बुरुजावर ध्वजारोहण करण्यात आलं. भवानी मातेला अभिषेक घालून या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यांनतर शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.. शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadanvis Government) प्रतापगडाच्या पायथ्याशी असणा-या अफजलखानाच्या कबरीभोवती अनेक वर्षापासूनचं अतिक्रमण हटवलं. त्यामुळे यंदाच्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रराजे प्रतापगडावर उपस्थित होते...
बातमी पाहा - प्रतापगडावर शिवप्रताप दिनाची धामधूम; शिवप्रेमींची गडावर गर्दी
30 Nov 2022, 11:29 वाजता
श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं केलं कबूल
Shraddha Walkar Murder Update : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातली मोठी बातमी... श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबने (Aftab Poonawalla) कबुल केलंय. आफताबची काल पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph Test) घेण्यात आली, त्यात आफताबने ही कबुली दिलीय. पण हत्या केल्याचं कोणतंही दु:ख नसल्याचंही त्याने कबुल केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पॉलिग्राफ टेस्ट करणा-या अधिका-यांच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलंय.
30 Nov 2022, 10:56 वाजता
काँग्रेसच्या सभेत शिरला वळू
Gujarat Assembly Election : गुजरातच्या मेहसाणामधील काँग्रेसच्या सभेत (Congress Rally) वळू घुसल्यानं एकच खळबल उडाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) यांच्या सभेत वळू घुसल्यानं खळबळ उडाली. मेहसाणाच्या (Mehsana) रेवा गावात मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचं भाषण सुरू असतानाच एक वळू सभास्थळाचा मंडप तोडून थेट लोकांमध्ये शिरला. बातमीचा पूर्ण व्हिडिओ पाहा सभेस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun kharge), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोल आणि काँग्रेस नेते जगदीश ठाकूर उपस्थित होते.
बातमी पाहा - सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ
30 Nov 2022, 09:45 वाजता
सावधान! गोवरचा उद्रेक वाढतोय
Pimpri - Chichwad Govar : मुंबईकरांची झोप उडविणा-या गोवरनं अखेर पुणे जिल्ह्यात (Pune District) शिरकाव केलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये पाच बालकांना गोवरची (Measles) लागण झालीय. पाच संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी आणि घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह आलेत. तपासणीसाठी हे नमुने मुंबईतल्या हाफकिन प्रयोगशाळेत (haffkine laboratories) पाठवण्यात आलेत. उद्रेक होऊ नये, यासाठी पालकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. कुदळवाडी परिसरातील बालकांना लागण झालीय.
30 Nov 2022, 09:18 वाजता
विक्रम किर्लोस्करांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Vikram Kirloskar Passed Away : टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर (Vikram Kirloaskar) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालंय. ते 64 वर्षांचे होते. कंपनीनेन ट्विट करुन ही माहिती दिलीय. आमच्या सद्भावना त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत आहेत असं ट्विट कंपनीने केलंय. बंगळुरुच्या हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी गितांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnatak Chief Minister ) यांनीही ट्विट करत किर्लोस्करांना श्रद्धांजली वाहिलीय.
बातमी पाहा - टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
30 Nov 2022, 08:25 वाजता
नवले पुलावर अपघातांची मालिका सुरुच
Pune News : पुण्यातील नवले पुलावर अपघातांची (Navale Bridge Accident) मालिका सुरूच आहे. पहाटेच्या सुमारास नवले पुलावर पिकअप व्हॅन आणि ट्रक यांच्यात धडक झाली. दुर्घटनेत 7 जण (7 Injured) जखमी झालेत. दुर्घटनेतील जखमींना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आलंय.
बातमी पाहा - नवले पूलावर अपघाताची मालिका सुरुच
30 Nov 2022, 08:12 वाजता
कोरोना लसीमुळं मृत्यू झाल्यास केंद्र सरकार जबाबदार नाही
Central Government In Supreme Court : कोरोना लसीने साईडइफेक्ट (Corona Vaccine Sideeffect) झाला आणि एखाद्याचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई मिळणार नाही असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलयं. कोरोना महासाथीला तोंड देण्यासाठी लसीकरण मोहीम (Vaccination campaign) राबवत असतानाच केंद्राने मांडलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. या लसींची निर्मिती सरकारने केलेली नाही. तसेच लसीच्या आवश्यक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे लसीच्या साईटइफेक्टने मृत्यूची अत्यंत दूर्मिळ घटना घडल्यास नुकसानभरपाईस सरकारला थेट जबाबदार धरणे न्यायविसंगत असल्याचं सरकारनं म्हटलंय.
30 Nov 2022, 07:34 वाजता
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा
Mumbai-Pune Express Way Security : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणा-यांसाठी मोठी बातमी. या मार्गावर आता 24 तास सुरक्षा ठेवण्यात (24 Hours Security) येणार आहे. त्यासाठी 12 पथकं (12 Team) तयार करण्यात आली आहेत. यात 30 अधिका-यांचा समावेश आहे. 1 डिसेंबरपासून या उपक्रमाची सुरुवात होईल. अपघातांना रोख लावण्यासाठी ही पथकं काम करतील. यानुसार अवैधरित्या पार्किंग करणा-यांवर कारवाई, वेगाचं उल्लंघन करणारी वाहनं, उजव्या लेनमध्ये कमी स्पीडमध्ये चालणारी वाहनं, लेन कटिंग करणा-या वाहनांवर कारवाई केली जाईल. एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way) अपघात टाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश (Chief Minister and Deputy Chief Minister had given instructions) दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येतेय.
बातमी पाहा - राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता एक्सप्रेस वेवरील अपघात टाळण्यासाठी 24 तास सुरक्षा असणार
30 Nov 2022, 07:29 वाजता
सावधान! गोवर वेगानं पसरतोय
Measles Outbreak : करोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि काही राज्यांमध्येही गोवरचा (Measles Outbreak) उद्रेक झालाय.. कोरोनापेक्षा (Corona) पाच पट वेगानं गोवर (Govar) पसरतोय.. गोवरचा सर्वाधिक धोका नवजात बालकांपासून 5 वर्ष वयाच्या मुलांना आहे.. साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अपवादात्मक परिस्थितीत 18 वर्षांवरील व्यक्तींना याची लागण झाल्याचं आढळून आलंय.. दरम्यान गोवरची लस 99 टक्के सुरक्षित आहे... त्यामुळे कोरोनाच्या तुलनेत गोवरचा धोका कमी आहे..
बातमी पाहा - राज्यात 34 ठिकाणी गोवरचा उद्रेक, कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरतोय
30 Nov 2022, 07:13 वाजता
गोरेगावच्या जंगलात भीषण आग, जीवितहानी नाही
Mumbai Fire : गोरेगावच्या (Goregaon) दिंडोशीमध्ये आयटी पार्कच्या जंगलात भीषण (Fire) आग लागली. दिंडोशी भागात आणि संजय गांधी नॅशनल पार्कला लागून असलेल्या जंगलात ही आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी (No Casualties) झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? याचा तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.
बातमी पाहा - दिंडोशी भागातील आयटीपार्कजवळ भीषण आग