Maharashtra Political News | Live Marathi News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत बैठक

 Latest Maharashtra News : Marathi Live News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स  

Maharashtra Political News | Live Marathi News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत बैठक

14 Dec 2022, 12:13 वाजता

Ajit Pawar Live | Maharashtra Political News  : 'याआधी आणीबाणीच्या काळात पुरस्कार रद्द केले होते',  'विरोधात बोलणाऱ्यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवलं जातंय', 'द्वादशीवारांची संमेलन अध्यक्षपदी निवड होणार होती', 'राजकीय दबावामुळे द्वादशीवारांची निवड रोखली',  'पुरस्कार रद्द करण्याच्या निर्णयाचं लंगडं समर्थन' विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राज्य सरकारवर टीका

 

14 Dec 2022, 12:07 वाजता

Ajit Pawar Live | Maharashtra Political News  : 'साहित्य क्षेत्रात सरकारनं ढवळाढवळ करू नये','जाहीर केलेले पुरस्कार रद्द केले','प्रत्येकाला आपलं मतं मांडण्याचा अधिकार', 'विचारांची लढाई विचारांनीच लढावी', फ्रॅक्चर फ्रीडमच्या रद्द केलेल्या पुरस्कारवरून अजित पवार यांची टीका.
 

14 Dec 2022, 11:56 वाजता

Ajit Pawar Live | Maharashtra Political News  : 'नवं सरकार आल्यापासून अनेक वाद निर्माण झालंय', 'सरकार स्थापनेपासून दररोज नवे वाद', 'महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी प्रकार'  विरोधी पक्षनेते अजित पवार  यांची राज्य सरकारवर टीका

 

14 Dec 2022, 11:47 वाजता

महाविकास आघाडी मोर्चाच्या आधीच्या ठिकाणामध्ये बदल

Maha Vikas Aghadi | Maharashtra Political News  : महाविकास आघाडी मोर्चाच्या आधीच्या ठिकाणामध्ये बदल करण्यात आलं आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुंबई पोलिसांची विनंती मान्य केली आहे.  17 डिसेंबर रोजी होणारा महाविकास आघडीचा मोर्चा रिचर्डसन क्रूडास मिल,जे जे फ्लाओव्हर भायखळा ते टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंग पर्यंत काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आलं आहे. आधी राणीची बाग ते आझाद मैदान मोर्चा काढला जाणार होता.थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. 

बातमी पाहा- मविआच्या मोर्चात मोठे बदल, आताच पाहा

14 Dec 2022, 11:08 वाजता

मुंबईतील 92 हॉटेल्स, 40 इमारतींना बीएमसीनं बजावली नोटीस 

Mumbai  Municipal Notice To 92 Hotels 40 Buildings : अग्निशमन यंत्रणा ठप्प असलेल्या मुंबईतील 92 हॉटेल्स, 40 इमारतींना बीएमसीनं नोटीस बजावलीय. संबंधितांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होत असल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आलीय. 4 महिन्यांत आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर कारवाई करण्यात येणारेय. मुंबईत लागणा-या आगीच्या दुर्घटनांमध्ये संबंधित इमारती किंवा बांधकामांच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचं समोर आलं. त्यामुळे महापालिकेकडून इमारतींना फायर ऑडिट करून दर 6 महिन्यांनी अहवाल सादर करणं बंधनकारक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येतंय. म्हणूनच महापालिकेकडून काही इमारतींची तपासणीही करण्यात येतेय. या मोहिमेत आतापर्यंत 440 हॉटेल्स-रेस्टॉरंट, 88 व्यावसायिक इमारतींची अग्निशमन दलाकडून झाडाझडती घेण्यात आलीय. त्यात आवश्यक उपययोजना नसलेल्या 92 हॉटेल्स आणि 40 इमारतींना नोटीस बजावण्यात आलीय. 

14 Dec 2022, 10:38 वाजता

चंद्रपुरातील घोडेवाही गावात हिऱ्यांची खाण

Chandrapur Diamond : चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणींची चर्चा असताना आता इथल्याच एका गावात हिऱ्यांची खाण असल्याचा दावा भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलाय. घोडेवाही गावातील ज्ञानेश्वर तीवाडे यांचं घर हि-यांच्या खाणीचं केंद्र ठरलंय. त्यांच्या घरातील चुलीखाली हिऱ्यांच्या खाणीचं केंद्र आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. या खाणीचं उत्खनन करण्यासाठी ग्रामपंचायत सरसावलीय. भूगर्भ शास्त्रज्ञांनी 1997-98 मध्ये सावली तालुक्यातील घोडेवाही आणि पाथरी इथं संशोधन केलं होतं. या संशोधनात गावातील 5 मिलोमीटरच्या परिघात हिऱ्यांचा साठा असल्याचं अहवालात सांगितलं होतं. आता सोन्याच्या खाणी सापडल्यानंतर हिऱ्याच्या खाणींचा तपास व्हावा अशी ग्रामस्थ मागणी करतायत.

बातमी पाहा- अबब! महाराष्ट्रातील 'या' खेड्यातील घरातल्या चुलीखाली दडलीय हिऱ्याची खाण

14 Dec 2022, 10:34 वाजता

शरद पवारांना आलेल्या धमकीप्रकरणी आरोपीला घेतलं ताब्यात

Sharad Pawar | Maharashtra Political News  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिसांनी आरोपीला बिहारमधून या आरोपीला ताब्यात घेतलंय. नारायण सोनी असं या आरोपीचं नाव आहे. त्याला आज मुंबईत आणलं जाणार आहे.. गेल्या काही दिवसांपासून तो सिल्व्हर ओक बंगल्यावर फोन करुन धमकी देत होता. पवारांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केलीये. 

बातमी पाहा- Sharad Pawar यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

 

14 Dec 2022, 09:13 वाजता

ठाणे-बीकेसी प्रीमियम सेवेला 'बेस्ट' प्रतिसाद

Best Premium Bus : ठाणे ते बीकेसी प्रीमियम सेवेला प्रवाशांचा बेस्ट प्रतिसाद लाभलाय. सोमवारपासूनच बेस्टने ही सेवा सुरु केली होती. नव्या इलेक्ट्रिक बसने 200 अधिकारी आणि कर्मचा-यांनी प्रवास केला. ठाणे ते बीकेसीदरम्यान 140 तर बीकेसी ते ठाणेदरम्यान 60 प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजे बस 50 टक्के भरली होती. हाच प्रतिसाद पाहून बेस्टने आता 25 डिसेंबरपासून तीन नवीन मार्गांवर ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. खारघर ते बीकेसी, ठाणे ते पवई आणि चेंबूर ते कफ परेडदरम्यान प्रीमियम बस सेवा सुरु केली जाईल. 

14 Dec 2022, 09:05 वाजता

मुंबईत फेरीवाला परवान्यासाठी डोमिसाईलची अट रद्द

Hawkers Domicile Certificate  : मुंबईत आता फेरीवाला परवाना काढायचा असल्यास डोमिसाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate) लागणार नाही. महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला असलेल्यांना फेरीवाला म्हणून परवाना देण्याची अट घालण्यात आली होती. पण शिंदे सरकारने (Eknath Shinde) ही अट रद्द केलीय. नगरविकास मंत्रालयाने तसा अध्यादेश जारी केलाय. मुंबईत फेरीवाल्यांमध्ये परप्रांतियांचं विशेष करुन उत्तर भारतीयांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका (Brihanmumbai Municipal Corporation) डोळ्यासमोर ठेऊन शिंदे सरकारने (Maharashtra Government) हा निर्णय घेतल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय.

14 Dec 2022, 08:32 वाजता

'धनुष्यबाणा'साठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली हायकोर्टात 

Shinde vs Thackeray | Maharashtra Political News  : 'धनुष्यबाणा'साठी ठाकरे गट (Uddhav Thackeray) पुन्हा दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरुद्ध दिल्ली हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी सिंगल बेंचनं ठाकरेंची याचिका फेटाळली होती. आता दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठापुढं पुन्हा अपील करणार आहे.

बातमी पाहा- 'धनुष्यबाणा'साठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात