14 Dec 2022, 07:38 वाजता
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या संपत्तीची चौकशी होणार
Rajan Salvi | Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार आहे. आज दुपारी 12 वाजता आमदार साळवी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साळवी यांना एसीबीची नोटीस आली होती. मात्र राजन साळवींनी यासाठी वेळ मागून घेतली होती.त्यानुसार आज ते चौकशीसाठी हजर राहणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांचीही एसीबी मार्फत चौकशी झाली होती.
बातमी पाहा- ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर
14 Dec 2022, 07:18 वाजता
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणारेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज दिल्लीत असतील. संध्याकाळी 7.30 वा. नवी दिल्लीत ही बैठक होईल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणारेय. अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमी पाहा- सीमाप्रश्नी महाराष्ट्र- कर्नाटकचे मुख्यमंत्री आज दिल्लीत