14 Dec 2022, 21:10 वाजता
सीमावादावरील शाहांसोबतच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय
Meeting on Borderism | Maharashtra Political News : सीमावाद मिटवण्यासाठी दोन्ही राज्यांकडून 3-3 मंत्र्यांची समिती नेमणार. सीमावादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं कुणाचीही बाजू घेऊ नये, ही महाराष्ट्र सरकारची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी मान्य केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अमित शाह यांच्याबरोबरच्या बैठकीत तशी विनंती केली होती. ती मान्य करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलंय. तसंच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी केंद्र सरकारनं पहिल्यांदाच पुढाकार घेतला आणि दोन्ही राज्यांना एकत्र बोलावल्याचं फडणवीस म्हणाले. तर या बैठकीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचे आभार मानलेत.
14 Dec 2022, 20:37 वाजता
सीमावादावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा- अमित शाह
Meeting on Borderism | Maharashtra Political News : सीमावादावरील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा- अमित शाह (Amit Shah) सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे तोवर कोणतंही राज्य एकमेकांच्या गावांवर हक्क सांगणार नाही, छोट्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी 3-3 मंत्र्यांची समिती गठीत करणार असे महत्त्वाचे मुद्दे बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आलेत.
14 Dec 2022, 20:09 वाजता
सीमावादावर अमित शाहांच्या उपस्थितीत पार पडली बैठक
Meeting on Borderism | Maharashtra Political News : सीमावादावर अमित शाहांच्या (Amit Shah)उपस्थितीत पार पडली बैठक, दिल्लीतील संसद भवनात झाली बैठक. सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची महत्त्वपूर्ण चर्चा.
चांगल्या वातावरणात चर्चा झाली- अमित शाह.
बातमी पाहा - https://bit.ly/3VWKw0z
14 Dec 2022, 18:43 वाजता
राज्यपालांच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध
Supreme Court on Governor | Maharashtra Political News : राज्यपालांच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) निर्बंध. राज्यपाल कोश्यारींना तूर्त आमदारांची नियुक्ती करता येणार नाही, राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिले आदेश. 7 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी.
बातमी पाहा - https://bit.ly/3hqdFSN
14 Dec 2022, 17:58 वाजता
'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द
Ajit Pawar on 'Fractured Freedom' | Maharashtra Political News : 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' पुस्तकाचा वाद विकोपाला. राज्य सरकारकडून साहित्य पुरस्कार रद्द, पुस्तकात नक्षलवादाचं उदात्तीकरण केल्याचा आरोप. निवड समितीतील सदस्यांचे राजीनामे
ही तर अघोषित आणीबाणी, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची टीका. साहित्य क्षेत्रात सरकारनं ढवळाढवळ करू नये. तसंच सरकारचा साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेप निषेधार्ह असल्याची टीका अजित पवारांनी केलीय.
बातमी पाहा - https://bit.ly/3UQYYG0
14 Dec 2022, 15:12 वाजता
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या 3 आरोपींचा जामीन मंजूर
Chandrakant Patil | Maharashtra Political News : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या 3 आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आलाय. पिंपरी न्यायालयानं मनोज गरबडेसह तिघांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिलाय. एवढंच नाही तर आरोपींवर लावण्यात आलेलं 307 कलमही रद्द हटवण्यात आलंय. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी आरोपींवर 307 कलम लावण्यात आलं होतं. त्यावरुन वादही निर्माण झाला होता. राज ठाकरेंसह अनेक नेत्यांनी हे कलम हटवण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
14 Dec 2022, 15:07 वाजता
सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली
Sushma Andhare | Maharashtra Political News : वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)माफी मागितलीय. सच्च्या वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते असं वक्तव्य त्यांनी केलंय. पण भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीकडूनच बदनामी केली जात असल्याचा आरोपही सुषमा अंधारेंनी केलाय. कोरोनामुळे जेव्हा मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. तेव्हा या निर्णयाला विरोध करणारा हा तुषार भोसलेंचा कंपू होता अशी टीकाही त्यांनी केलीय. वारकऱ्यांबाबत व्हिडिओ हा 2009 मधला असल्याचं अंधारेंनी स्पष्ट केलं. हे व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याचं भाजप आघाडीचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. ईडी मागे लावता येत नसल्यानं व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
14 Dec 2022, 13:43 वाजता
सोनं आणि चांदीला पुन्हा झळाली
Gold And Silver Price Hike : गेल्या 24 तासांत सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झालीय. सोनं 800 रुपयांनी तर चांदी 1500 रुपयांनी महाग झालीय. सोन्याचे भाव 55 हजार 800 प्रतितोळा तर चांदी 70 हजार रुपये प्रतिकिलो झाल्याने लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे.
बातमी पाहा- ऐन लग्नसराईत सोनं-चांदी महागली
14 Dec 2022, 13:03 वाजता
विदर्भातील संत्र्यावर कोळशी रोगाचं संकट
Nagpur Orange : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकाटत सापडलाय. संत्रा बागांवर कोळशी रोगाचा चा प्रादुर्भाव झालाय. यामुळे संत्र्याच्या बागा काळवंडल्यात. विदर्भातील जवळपास 30 ते 40 टक्के संत्र्याच्या बागांवर कोळशीचं संकट ओढावलंय. या रोगामुळे संत्र्याचं उत्पन्न पुढच्या वर्षीही घटण्याची शक्यताय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.
बातमी पाहा- बापरे! एकाएकी फळं लगडलेल्या संत्र्यांच्या झाडांना हे काय झालं?
14 Dec 2022, 12:18 वाजता
Ajit Pawar Live | Maharashtra Political News : 'पुरस्कार हा राजकीय नेत्यांनी दिलेला नव्हता', 'अनुवादाला पुरस्कार मिळाला असेल तर आक्षेप का ?', अजित पवार यांचा राज्य सरकारला टोला. 'अमित शाहांनी सीमावादावर तोडगा काढावा ही अपेक्षा' , सीमावादावरून अजित पवार यांचं वक्तव्य. 'नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सुरू करा', 'महत्त्वाच्या मान्यता मिळूनही प्रकल्प रखडला' प्रकल्प का मंजूर केला जात नाही ?' अजित पवार यांचा राज्य सरकारला सवाल.
बातमी पाहा- अजित पवार सरकारवर संतापले, 'त्यांना साहित्य-संस्कृतीवर नियंत्रण हवेय'